वजन कमी करण्यासाठी व्यायाम- घरीच करता येणारे 10 सोपे व्यायाम.

नियंत्रित वजन असणे हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. निरोगी राहण्यासाठी लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन हे किती अडचणीचे ठरू शकते याचा बऱ्याच जणांना अनुभव देखील आला असेल. त्याननंतर वजन कमी करण्यासाठी व्यायाम, डायट, इंटरमीटंट फास्टिंग, आयुर्वेदिक औषध आणि इतर बरेच उपाय केले देखील असतील.

संबंधित- वजन कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक औषधे मदत करतात ?

व्यायाम करून वजन कमी करणाऱ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न नेहमीच पडतो. तो म्हणजे की कोणत्या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होते किंवा वजन कमी होते.

तुम्हाला देखील व्यायाम करून वजन कमी करायचे आहे पण नेमके समजत नाही की कोणता व्यायाम केला पाहिजे, कोणत्या व्यायामामुळे पोटाची सर्वात जास्त चरबी बर्न होते.

तुमच्या या आणि या संबंधित अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग मधून मिळणार आहे.

या ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणत्या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते, त्या व्यायाम प्रकारांची माहिती तसेच ते कसे वजन कमी करण्यास मदत करतात याची सविस्तर पणे माहिती बघायला मिळणार आहे.

कोणत्या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होते?

ही अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे की तुम्ही वजन कमी करायचे ठरवले आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात तुमचा हा पहिलं निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणारा आहे. कारण बरेच जण त्यांच्या आयुष्यात या निर्णयापपर्यंत देखील पोहचू शकत नाही.

संबंधित- वजन कमी करण्यासाठी काय काय करावे लागते ?

तुम्ही या निर्णयापर्यंत पोचले त्यासाठी तुमचे अभिनंदन.

आता तुम्हाला प्रत्यक्षात यासाठी मैदानात उतरायचे आहे. पण लढाई जिंकण्यासाठी कोणते हत्यार लागतात आणि ते कसे वापरतात याची माहितीच तुमच्याकडे नाही.

अशा परिस्थितिमध्ये तुम्ही मैदानात उतरलात तर तुमचा पराभवच होण्याचीच शक्यता अधिक आहे.

थोडक्यात काय तर तुम्हाला वजन कमी करायचे आहे आणि त्यासाठी नेमके कोणते व्यायाम उपयोगी ठरतात याचीच माहिती नसेल तर तुमच्या हाती निराशा नक्की पडणार आहे.

व्यायाम अनेक प्रकारचे आहेत. पण वजन कमी करण्याच्या दृष्टीने काही ठराविक व्यायाम केले तर त्याचा अधिक फायदा तर होतोच, त्याचे परिणाम ही लवकर दिसायला लागतात.

चला तर मग तुम्हाला स्पष्टपणे, सरळ आणि नेमकेपणाने वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम अधिक उपयोगी ठरणार त्याची माहिती बघूयात.

१. कार्डियो एक्झरसाइज

वजन कमी करण्यासाठी कार्डियो एक्झरसाइज खूप महत्वाची आहे. आता ही कार्डियो एक्झरसाइज म्हणजे काय, त्या कशा पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात आणि कार्डियो करण्यासाठी आपण कोणते व्यायाम करू शकतो याची माहिती तुम्हाला पुढे जाणून घेतायेणार आहे.

‘कार्डियो’ हा एक वैद्यकीय भाषेतला शब्द आहे. याचा अर्थ ह्रदयाशी संबंधित घटकांना जोडण्यासाठी होतो. थोडक्यात कार्डियो म्हणजे ह्रदय. त्यामुळे कार्डियो एक्झरसाइज म्हणजे ह्रदया संबंधित व्यायाम.

संबंधित- ह्रदयविकार येण्याचे खरे कारण कोणते ?

कार्डियो एक्झरसाइज मध्ये महत्वाच्या तीन गोष्टी साध्य केल्या जातात. तुमच्या ह्रदयाची ताकत आणि कार्यक्षमता वाढवणे, मेटाबॉलीजम वाढवणे आणि फफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणे.

आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की याचा वजन कमी होण्याशी काय संबंध आहे. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर सविस्तर पणे जाणून घेऊया.

कार्डियो व्यायामामुळे वजन कसे कमी होते ?

तुमच्या शरीरात तुम्ही जे खाता आणि पिता यामध्यमातून ऊर्जा तयार होत असते. ही ऊर्जा तुमच्या शरीरात कॅलरीज च्या स्वरूपात साठवली जाते.

दिवसभरात या उर्जेचा उपयोग तुमच्या शारीरिक विषयक हालचाली, मानसिक क्रिया आणि महत्वाच्या फिजियोलॉजिकल प्रक्रिया जशा की तुमची पचनक्रिया, श्वसनक्रिया, उत्सर्जन प्रक्रिया या सर्व पार पाडण्यासाठी केला जातो.

या सर्वांमधून जेवढी ऊर्जा खर्च होऊन, जी ऊर्जा उरेल ती ऊर्जा फॅट्स च्या स्वरूपात शरीरात साठवली जाते. यामुळे तुमच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणात फॅट्स चे वितरण होऊन त्या ठिकाणी ते साठवले जाते. उदाहरणार्थ पोटाच्या भोवती, अवयवांच्या भोवती, मांडीच्या प्रदेशात.

अशा प्रकारे तुमचे एकंदर शरीराचे वजन वाढत असते.

आता वजन कमी करण्यासाठी सहाजिकच तुम्हाला शरीरात साठलेली ही चरबी किंवा फॅट्स कमी करावे लागेल. असे केल्यावरच तुमचे वजन हे नॉर्मल किंवा आहे त्यापेक्षा कमी होणार आहे.

पोटाची चरबी किंवा शरीरातील हे फॅट्स कसे कमी होणार ?

वजन कमी करण्याच्या दृष्टीने तुम्हाला पोटाची चरबी किंवा एकंदर तुमच्या शरीरात जमा अतिरिक्त चरबी ही कमी करावी लागेल.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला साध्य कराव्या लागतील.

  • जमा झालेल्या फॅट्स चा उर्जेसाठी साठी उपयोग करून फॅट्स ला कमी करणे.
  • वरील गोष्ट साध्य करत असताना वरचेवर पुन्हा फॅट्स जमा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे.

या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला त्या अनुषंगाने पुन्हा कोणत्या गोष्टी साध्य कराव्या लागतील हे ही तेवढेच महत्वाचे आहे.

  • जमा झालेल्या फॅट्स च्या बाबतीत- शरीरात काही ठिकाणी जमा झालेल्या फॅट्स चा उपयोग उर्जे साठी उपयोग करण्याअगोदर तुम्हाला कॅलरी डेफीजिट मोड मध्ये जावे लागेल.
  • वरचेवर पुन्हा फॅट्स जमा होऊ नये यासाठी- चयापचय क्रिया वाढवावी आणि सुधरावी लागेल.

कॅलरी डेफीजिट म्हणजे काय ?
जेव्हा आपण खाललेल्या उर्जे म्हणजे कॅलरी पेक्षा शरीर जास्त ऊर्जा खर्ची करतो किंवा उपयोगी करावी लागते तेव्हा अशा स्थितीला कॅलरी डेफिसिट म्हटले जाते. ही स्थिति वजन कमी करण्यासाठी एक अनुकूल परिस्थिति असते. या परिस्थितिमध्ये शरीराला अतिरिक्त कॅलरीज ची गरज भासते जी साचलेल्या फॅट्स मधून मिळवल्या जातात. म्हणजे साठलेल्या चरबी चा इथे उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ, समजा एका दिवसात तुम्ही तुम्ही 1500 कॅलरीच खाल्ल्या पण 2000 कॅलरीज लागतील एवढे परिश्रम घेतले तर अजून अतिरिक्त लागणाऱ्या 500 कॅलरीज या तुमच्या शरीरात अगोदरपासून साठलेल्या चरबी मधून मिळवल्या जातात.

या सर्वांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास आपल्याला असं सांगता येईल की शरीरातील आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी कॅलरी डेफीसिट स्थिति निर्माण करणे आणि शरीराची चयापचय क्रिया वाढवणे किंवा ती सुधारणे हे खूप महत्वाचे किंवा क्रमप्राप्त आहे.

यानंतर मी तुम्हाला कार्डियो व्यायाम कोणते हे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही लगेच तुमचे वजन कमी करण्याच्या अनुषंगाने त्यांची सुरुवात करू शकता.

वजन कमी करण्यासाठी कोणते कार्डियो व्यायाम करावे ?

कार्डियो व्यायाम करत असताना काही विशिष्ठच कार्डियो एक्झरसाइज कराव्यात असे काही नाही. कार्डियो व्यायामाच्या वरील व्याख्यानुसार ज्या एक्झरसाइज ते निकष पूर्ण करतात ते कोणतेही व्यायाम केले तरी त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल.

कार्डियो व्यायाम कोणते हे तुम्हाला माहिती नसेल तर त्यांची थोडक्यात माहिती आपण इथे बघूया.

१. जॉगिंग किंवा धावणे

वजन कमी करण्यासाठी धावणे
धावणे किंवा जॉगिंग

जॉगिंग, धावणे किंवा पटापट चालणे यामुळे तुमचा हार्ट रेट वाढतो आणि श्वासगती सुद्धा वाढते. त्यामुळे यांना आपण कार्डियो एक्झरसाइज म्हणू शकतो. दररोज ३० मिनीट पर्यन्त हे व्यायाम केल्याने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

संबंधित- दररोज किती वेळ व्यायाम करावा ?

२. सायकलिंग

वजन कमी करण्यासाठी सायकलिंग
सायकलिंग

सायकलिंगने सुद्धा तुम्हाला दम लागल्यासारखे जाणवेल. याचाच अर्थ तुम्हाला कार्डियो एक्झरसाइज चा फायदा मिळत आहे असे समजावे. यासाठी सपाट रस्त्यावर तुम्हाला जमेल त्या वेगाने सायकल चालवा किंवा घरच्या घरी स्टॅशनरी बाईक आणून त्याचा सुद्धा उपयोग करू शकता.

३. स्विमिंग

वजन कमी करण्यासाठी स्विमिंग
स्विमिंग

कार्डियो साठी स्विमिंग हा प्रभावी उपाय आहे. शिवाय स्विमिंग एक लो-इम्पॅक्ट व्यायाम प्रकार आहे. कारण स्विमिंग करत असताना तुमचे सांधे आणि मणक्यावर कमीत कमी दाब येत असतो.

४. स्कीपिंग (दोरीवर उडी मारणे)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी skipping rope
स्कीपींग जंप

स्कीपिंग रोप वर स्कीपिंग करणे हा माझा आवडता कार्डियो व्यायाम प्रकार आहे. हा एक उत्कृष्ट कार्डियो व्यायाम आहे. स्कीपिंग तुम्ही घरी, जीम आणि आहे त्या ठिकाणी करू शकता.

५. जुंबा डान्सिंग

वेट लॉस साठी झुंबा डांस
झुंबा डांस

संगीत किंवा गाणे लावून त्यावर कार्डियाक वर्कआउट करणे याला जुंबा डान्सिंग म्हणतात. कार्डियो व्यायाम करण्यासाठी महिला जुंबा डान्सिंग करू शकता. जुंबा डान्सिंग सुद्धा कार्डियो व्यायाम चेच काम करतो. शिवाय यामध्ये मनोरंजन सुद्धा होते. त्यामुळे हा एक सोपा आणि मनोरंजक असणारा व्यायाम प्रकार आहे.

हे सर्व व्यायाम प्रकार कार्डियो एक्झरसाइज आहेत. या सर्व व्यायाम प्रकारांमध्ये तुम्हाला दोन साधर्म्य बघायला मिळेल.

  • एक म्हणजे यामुळे तुमच्या ह्रदयाची (हार्ट रेट) गती वाढते.
  • दुसरे, यामुळे तुमची श्वास गती वाढते.

त्यामुळे या सर्व व्यायाम प्रकारांमुळे तुमच्या शरीरातून शक्य तेवढ्या जास्त कॅलरीज बर्न होण्याचे काम होते.

कार्डियो करताना ‘हे’ लक्षात ठेवा.

कार्डियो किंवा कोणताही नवीन व्यायाम प्रकार करत असताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्याबद्दल खाली जे सांगत आहे त्या गोष्टी तुमच्या मनात खोलवर रुजू द्या.

  • कार्डियो व्यायाम निवडताना ते तुम्ही तूमची आवड आणि क्षमता नुसार निवडायचे आहे.
  • दूसर सर्वात महत्वाचा विषय आहे की निवडलेला कोणताही कार्डियो व्यायाम प्रकाराची सुरवात हळू हळू करा. तुम्हाला जेव्हा तो व्यायाम सोपा जाईल, क्षमता वाढेल तेव्हा व्यायामाचे प्रमाण वाढवू शकता.

२. स्ट्रेन्थ एक्झरसाइज

शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी करण्यासाठी किंवा एकंदर वजन कमी करण्यासाठी स्ट्रेन्थ एक्झरसाइज या दुसऱ्या व्यायाम प्रकारांची सुद्धा आवश्यकता असते. स्ट्रेन्थ एक्झरसाइज ला स्ट्रेन्थ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, वेट एक्झरसाइज असे सुद्धा म्हटले जाते.

स्ट्रेन्थ एक्झरसाइज चा एक मुख्य फायदा म्हणजे स्नायूंचा आकार आणि घनता वाढवणे. हाच घटक पुढे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तो कसा हे तुम्हाला पुढे कळेलच.

सर्वात अगोदर तुम्हाला स्ट्रेन्थ एक्झरसाइज म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय होतात या बद्दल थोडक्यात सांगतो. स्ट्रेन्थ एक्झरसाइज असे व्यायाम प्रकार आहेत ज्यामध्ये तुमच्या शरीराच्या काही ठराविक जागेच्या स्नायूंची ताकत आणि क्षमता वाढवली जाते. अर्थातच यामुळे तुमच्या स्नायूंची ताकत वाढते.

स्ट्रेन्थ एक्झरसाइज मुळे वजन कसे कमी होते ?

स्ट्रेन्थ एक्झरसाइज मुळे चरबी किंवा वजन कमी होण्यास कशी मदत होते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला या मागचे विज्ञान समजून घ्यायला लागेल.

मी वर सांगितल्याप्रमाणे स्ट्रेन्थ एक्झरसाइज चा मुख्य उद्देश तुमचे स्नायू मजबूत करण्याचा असतो. अर्थातच यामध्ये मग तुमच्या स्नायूंचा आकार आणि घनता वाढते. स्नायूंचा वाढलेला हा आकार तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

  • तुमच्या शरीरातील स्नायूंचा आकार आणि घनता जेवढे जास्त तेवढे तुमच्या शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता जास्त. कारण फॅट पेक्षा स्नायू हे कॅलरी जास्त जाळतात.

हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा तुमच्याकडे दोन गाड्या आहेत. एक गाडी चांगली भारदस्त, जास्त इंजिन क्षमता असलेली म्हणजे जास्त CC असलेली आहे. दुसरी गाडी ही तुमची कमी CC ची आहे. तुम्हाला चांगला परफॉर्मेंस पाहिजे असेल तर जास्त CC आणि भारदस्त असणाऱ्या गाडी ला जास्त इंधन लागेल. त्याउलट कमी CC असणाऱ्या गाडीला कमी.

या ठिकाणी जास्त इंजिन क्षमता असणारी गाडी म्हणजे तुमचे स्नायू आणि कमी क्षमता असणारी गाडी म्हणजे तुमचे फॅट.

म्हणून स्नायू आणि फॅट मध्ये काय फरक आहे स्पष्ट सांगायचे झाल्यास एक ग्रॉम फॅट ला काम करायला जर ५ ग्राम कॅलरीज लागत असतील तर तेवढ्याच १ ग्रॉम स्नायू ((मसल्स) ला काम करण्यासाठी १० कॅलरीज लागतात. याचे मुख्य एक कारण म्हणणजे स्नायू हे फॅट पेक्षा अधिक सक्रिय असतात.

त्यामुळे जेवढे अधिक तुमचे स्नायू स्ट्रॉंग असतील तेवढी जास्त तुमच्या शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता अधिक असेल.

  • वाढलेल्या स्नायूंची अजून एक विशेषता म्हणजे ‘आफ्टर बर्न इफेक्ट’. जेव्हा तुमचे स्नायू मजबूत व्हायला लागतात तेव्हा आफ्टर बर्न इफेक्ट दिसायला लागतो.

आफ्टर बर्न इफेक्ट म्हणजे तुम्ही व्यायाम केल्यानंतर देखील काही तास तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होत राहणे. काही अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की स्ट्रेन्थ एक्झरसाइज करत असताना तर तुमच्या कॅलरीज बर्न होतच राहतात. पण जेव्हा तुम्ही तुमची एक्झरसाइज करायचे थांबवतात तेव्हा त्यानानंतर सुद्धा काही तास तुमच्या कॅलरीज बर्न होत राहतात.

२०१४ साली रिसर्च क्वार्टरली फॉर एक्सरसाइज अँड स्पोर्ट मध्ये याबद्दल एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या रिसर्च मध्ये स्ट्रेन्थ एक्झरसाइज आफ्टरबर्न इफेक्ट दाखवत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. यानुसार आफ्टरबर्न इफेक्ट वाढवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग हे प्रभावी साधन असल्याचे नमूद केले आहे.

  • स्ट्रेन्थ एक्झरसाइज वजन कमी करण्यास मदत करायला तिसरे कारण ठरते ते मेटबॉलीजम चे. स्ट्रेन्थ एक्झरसाइज मुळे तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट (Basal Metabolic Rate) वाढतो.

बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे काय ?
बेसल मेटाबॉलिक रेट ला BMR असं म्हटलं जात. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे तुम्ही विश्रांतीच्या स्थिति मध्ये असताना तुमच्या शरीराचे मूलभूत कार्य जसे की श्वास घेणे, रक्ताभिसरण, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, हृदयाचे कार्य, इ. पार पाडण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण.
उदाहरणार्थ, जर तुम्ही संपूर्ण दिवसभर काहीही केले नाही, फक्त विश्रांती घेतली, तरी तुमचे शरीर त्या स्थिति मध्ये किती कॅलरीज खर्च करते, ते म्हणजे तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजेच तुमचा BMR. या स्थितीतमध्ये साहजिकच तुमच्या कॅलरीज जास्त बर्न व्हायला लागतील, परिणामी तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाईज जर्नल मध्ये या विषयी एक महत्वपूर्ण अभ्यास प्रकाशित झालेला आहे. या अभ्यासात स्ट्रेन्थ एक्झरसाइज करणाऱ्या विविध वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्या बेसल मेटाबॉलिक रेट चा अभ्यास करण्यात आला होता.

या अभ्यासातील लेमर आणि त्यांच्या इतर संशोधक सहकाऱ्यांना असे आढळून आले की स्ट्रेन्थ एक्झरसाइज मुळे तुमच्या बेसल मेटाबॉलिक रेट मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. फक्त त्यांनी बेसल मेटाबॉलिक रेट एवजी रेस्टिंग मेटाबॉलिक रेट असा शब्द प्रयोग केला आहे.

हा परिणाम विशिष्ठ वयोगटातील लोकांपुरता मर्यादित नव्हता तर तरुण आणि वृद्ध वयोगटातील लोकंमध्ये सुद्धा हा परिणाम दिसून आला.

त्यामुळे स्ट्रेन्थ एक्झरसाइज फक्त तुमच्या स्नायू आणि आकर्षक शरीरयष्टी वर काम करत नाही तर एकंदर तुमच्या शरीराची कार्यपद्धती आणि कार्यक्षमता सुद्धा वाढवतात.

स्ट्रेन्थ ट्रेनिंग एक्झरसाइज साठी तुम्ही काय करू शकता ?

स्ट्रेन्थ एक्झरसाइज करण्यासाठी तुम्ही बरेच व्यायाम करू शकता. इथे मी तुम्हाला तुम्ही Beginner आहात हे समजून तुम्हाला काही स्ट्रेन्थ एक्झरसाइज सांगणार आहे ज्या अगदी सोप्या असणार आहेत.

1. पुश-अप्स (Push-Ups)

पुश अप पासून वजन कमी करणे
पुश अप

पुश-अप्स ही एक्झरसाइज बॉडी वेट एक्झरसाइज प्रकाराची आहे. या व्यायामामध्ये तुमच्या शरीराच्या वजनाचा उपयोग केला जातो. यामध्ये तुमच्या छाती, खांदे, हात, आणि पोटाच्या स्नायूंना केंद्रित करून त्यांना बळकट केले जाते.

२. स्क्वॅट्स (Squats):

स्क्वॅट्स वर्क आउट
स्क्वॅट्स

स्क्वॅट्स मुळे तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. यामध्ये तुमच्या गुडघे, मांड्या आणि जांगेच्या स्नायूंचा सुद्धा व्यायाम होतो.

३. लंजेस (Lunges):

lunges
लंजेस

लंजेस तुमच्या पाय आणि नितंबाच्या स्नायूंना बळकट करण्याचे काम करतात. यासाठी एका पायाने पुढे पाऊल टाकून, दुसरा पाय मागे ठेवावा. त्यानंतर पुढच्या पायाचा गुडघा वाकवून शरीर खाली घ्यावे, आणि परत उभे राहावे. अशा प्रकारे तुमचं एक लंज पूर्ण होतो.

४. प्लँक (Plank):

प्लॅंक, plank
प्लँक

प्लँक तुमच्या पूर्ण कोअर च्या स्नायूंना मजबूत करण्याचे काम करतो. तुमच्या शरीराचा कोअर तुमचे पोट, पाठीचा कणा आणि पेल्विक फ्लोर या भागांपासून बनलेला असतो.

प्लँक एक्झरसाइज तुमच्या कोअर भागातील स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते.

५. डेडलिफ्ट (Deadlift):

 डेडलिफ्ट वर्क आउट
डेडलिफ्ट

डेडलिफ्ट हा प्रकार थोडं एडवांस्ड आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या क्षमता नुसार वजन उचलून, त्यानानंतर उभे राहून पुन्हा वजन खाली ठेवावे लागते.

तुम्ही जर अनुभवी असाल तर डेडलिफ्ट करणे सोपे आहे. पण जर व्यायाम करण्यासाठी नवीन असाल तर हे जिम ट्रेनर च्या मार्गदर्शनात करण्याची गरज आहे.

कार्डियो प्रमाणेच स्ट्रेन्थ एक्झरसाइज तुम्हाला तुमच्या क्षमता आणि आवडीनुसार करावी.

स्ट्रेन्थ एक्झरसाइज मध्ये फोर्म किंवा टेक्निक खूप महत्वाच्या असतात. एखादी स्ट्रेन्थ एक्झरसाइज तुम्ही योग्य पद्धतीत केल्यावरच त्याचा फायदा तुम्हाला होतो. चुकीच्या पद्धतीने केल्यावर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता कमी आणि दुखापत होण्याची शक्यताच अधिक राहते.

स्ट्रेन्थ एक्झरसाइज च्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. बरीच नवीन मंडळी एकाच ठिकाणच्या स्नायूंवर काम करून त्या स्नायूंना मजबूत आणि आकर्षित करत असतात. अशा परिस्थिमध्ये इतर ठिकाणचे स्नायू विकसित होत नाहीत.

त्यामुळे शरीराच्या शरीराच्या सर्व भागांच्या स्नायूंना केंद्रित ठेवून स्ट्रेन्थ एक्झरसाइज केली पाहिजे. स्ट्रेन्थ एक्झरसाइज तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटू शकता. पण कालांतराने यामध्ये तुमचे स्नायू बळकट होऊन तुमची ताकत आणि स्टॅमिना वाढत असल्यामुळे या एक्झरसाइज मध्ये कमी त्रास झालेला जाणवतो.

हे सर्व झालं स्ट्रेन्थ एक्झरसाइज बद्दल.

आता पर्यंत आपण वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन व्यायाम पद्धतींची चर्चा केली आणि माहिती घेतली. कार्डियो एक्झरसाइज आणि स्ट्रेन्थ एक्झरसाइज. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यासाठी आणि एकंदर तुमच्या फिटनेस साठी किती महत्वाचे आहे याची एक तांत्रिक दृष्ट्या माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी अपेक्षा करतो.

तुम्ही वजन कमी करण्याच्या दृष्टीने लगेच हे व्यायाम सुरुवात करणार असाल तर काही गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही तुमच्यासाठी जो रूटीन तयार कराल, त्यामध्ये कार्डियो आणि स्ट्रेन्थ एक्सरसाइज यांचे संतुलन असले पाहिजे. कारण दोन्ही प्रकारच्या व्यायामांनी मिळणाऱ्या फायद्यांना एकंदर घेऊनच तुमचे वजन कमी होणार आहे.

लास्ट बट नॉट लीस्ट

शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर कार्डियोने तुमच्या हृदयाची क्षमता वाढते, शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते, आणि तुमची सहनशक्ती सुधारते. तर स्ट्रेन्थ एक्सरसाइजमुळे तुमचे स्नायू बळकट होतात, तुमच्या शरीराचा बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) वाढतो आणि हाडे सुद्धा मजबूत होतात.

वजन कमी करणे हा तुमचा तात्पुरता उद्देश नसला पाहिजे. म्हणजे मला आकर्षक दिसण्यासाठी वजन कमी करायचं किंवा लग्नाच्या किंवा कोणत्या कार्यक्रमात मला चांगले दिसायचे म्हणून वजन कमी करायचे आहे असे तुमचे निरर्थक प्रकरण नसायला हवे.

वजन कमी करणे हे तुमच्या जीवनाचा एक उद्देश असला पाहिजे. जसं कुणाच्या ही आयुष्यात खुश राहणे हा उद्देश असतो तसंच दीर्घकाळ निरोगी आणि उत्साही राहणे आणि त्यासाठी आपले वजन नियंत्रित ठेवणे हा उद्देश असला पाहिजे.

नक्कीच, सुरुवातीला हे सगळं तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं, पण हा प्रवास चालू केल्यानंतर प्रत्येक छोटे मोठे पाऊल हे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करणार आहे.

यामध्ये सातत्यता एक महत्वाचा घटक आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुमचे सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याच्या ध्येयसाठी हा एक महत्वपूर्ण घटक ठरणार आहे. व्यायाम कमी केलात तरी चालेल पण त्यामध्ये सातत्य मात्र नक्की ठेवा. कितीही व्यस्त असलात तरी, प्रत्येक दिवसात स्वतःसाठी काही वेळ काढा. तो वेळ तुमच्या आयुष्याची महत्वाची गुंतवणूक असणार आहे.

तर, आता विचार कमी करा आणि आपल्या प्रवासाची सुरुवात करा! आहारात छोटे बदल करा, रोज व्यायामाची सवय लावा, आणि लक्षात ठेवा…हा प्रवास तुमच्यासाठी आणि तुमचाच आहे.

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी काय काय खावे लागते ?

तुमच्या प्रत्येक यशस्वी टप्प्यानंतर तुम्ही अधिक सक्षम आणि समाधानी फील करताल. आजच एक छोटेसे धाडस करा – आणि त्याचा परिणाम काय आणि कसा होतो ते पाहा!

तर आता अजिबात थांबू नका. वाचनापासून कृतीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. ब्लॉगमधून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक माहितीचा उपयोग करा आणि वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रवासाला लगेच सुरुवात करा.

तसंच ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असेल कमेन्ट करून नक्की कळवा.धन्यवाद.

3 thoughts on “वजन कमी करण्यासाठी व्यायाम- घरीच करता येणारे 10 सोपे व्यायाम.”

  1. खूपच छान मार्गदर्शन केले आहे, नक्कीच याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो हे कळले

    Reply

Leave a Comment