युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय- या ५ उपायांनी तुमचे वाढलेले युरिक ऍसिड लगेच येणार खाली

(uric acid meaning in marathi, uric acid kami karnyache upay in marathi, uric acid treatment iin marathi, Uric acid kami karnyache upay in marathi, uric acid kami karne, uric acid kami kase karave, uric acid kami karnyasathi gharguti upay, uric acid kami karnyasathi upay, uric acid in marathi, gout meaning in marathi )

रक्तातील वाढलेले युरिक ऍसिड हे अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते असते. त्याचमुळे वाढलेले हे युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय आपण जाणून घ्यायला हवेत. कारण वाढलेल्या युरिक ऍसिड मुळे ज्या आरोग्य समस्या उद्भवतात, त्या अजून गंभीर होऊ नये यासाठी युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच केले पाहिजेत.

थोडक्यात

युरिक ऍसिड म्हणजे काय ?

आपल्या शरीरात निसर्गता आणि काही आहाराच्या माध्यमातून प्युरिन (purine) हा रासायनिक घटक शरीरात असतो.

पुढे या प्युरिनचे विघटन होऊन त्यातून युरिक ऍसिड तयार होते. त्यानंतर हे युरिक ऍसिड किडनी मध्ये जाऊन आपल्या लागवीतून शरीराबाहेर पडते. म्हणजे युरिक ऍसिड हा टाकाऊ (excretory product) पदार्थ आहे. पण काही कारणांमुळे हे लागवीतून बाहेर न पडता शरीरात काही ठिकाणी जमा होते. रक्तातील हे युरिक ऍसिड वाढल्यावर अनेक लक्षणे दिसायला सुरुवात जसे संधिवात, वातरक्त किंवा संधीरोग (gout).

युरिक ऍसिड वाढण्याची कारणे

युरिक ऍसिड वाढण्याची अनेक कारणे आहेत. एकतर ज्यामध्ये प्युरिन जास्त आहे असा आहार जास्त प्रमाणात घेणे आणि दुसरे म्हणजे लगवीद्वारे जे युरिक ऍसिड बाहेर पडणे अपेक्षित आहे ते बाहेर न पडता शरीरात जमा होणे. एकंदर विचार केला तर खालील सर्व कारणे युरिक ऍसिड चे प्रमाण वाढण्यासाठी जबाबदार घटक आहेत.

  • जास्त बीयर पिणे (यामधे भरपूर प्रमाणात प्युरिन असते)
  • मांसाहार
  • कमी पाणी पिणे
  • किडनी चे काही आजार
  • ल्यूकेमिया
  • Diuretics वापरणे
  • हायपोथायरॉईडीझम
  • उच्च रक्तदाब
युरिक ऍसिड वाढण्याची वाढण्याची लक्षणे

युरिक ऍसिड वाढण्याची लक्षणे

रक्तातील युरिक ऍसिड वाढल्यावर ते अनेक ठिकाणी जमा होते आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करते.

  • वातरक्त किंवा संधीरोग (gout)
  • मुतखडे

वरील दोन्ही प्रकारच्या आजारात भयंकार वेदना होतात, सूज येते, सूज आलेल्या ठिकाणी लालसर होते.

हे रक्तातील वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी असे काही घरगुती उपाय बघूया.

शरीरातील वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय

१. पाणी भरपूर प्या

शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या

शरीरात असणारे भरपूर प्रमाणात पाणी हे तुमच्या रक्तातील युरिक ऍसिड ला बाहेर फेकण्याचे काम करते. त्यामुळे युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय बघत असताना पाणी हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.

आर्थरायटिस फाऊंडेशन नुसार भरपूर प्रमाणात पाणी पिणे हे रक्तातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

याचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील दोन तृतीयांश एवढे युरिक ऍसिड हे फक्त किडनी द्वारे शरीराबाहेर फेकल्या जाते. त्यामुळे अर्थातच तुम्ही जर जास्त पाणी पिलात तर त्याने जास्त लगवी तयार होईल ज्या मार्फत युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकल्या जाईल.

जास्त पाणी पिणे आणि रक्तातील युरिक ऍसिड चा कसा संबंध याबद्दल थोडे अजून जाणून घेऊया.

  • युरिक ऍसिड हा एक टाकाऊ पदार्थ (excretory product) आहे. शरीरासाठी युरिक ऍसिड ची विशेष आवश्यकता नसते. लगवी मार्फत ते शरीराबाहेर पडावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे जेव्हा शरीरातील पाणी वाढेल तेव्हा आपोआप ते पाणी रक्तात मिसळून रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी होईल.
  • युरिक ऍसिड हे किडनी द्वारे लगवीमार्फत बाहेर फेकल्या जाते. यामुळे जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता तेव्हा रक्ताचे ही प्रमाण वाढते. नंतर या वाढलेल्या रक्ताचे किडनी मध्ये जाऊन filtration होते. या प्रक्रिया मध्ये लगवी तयार होऊन त्यात हे युरिक ऍसिड मिसळून शरीराबाहेर फेकल्या जाते.
  • लगवी च्या मार्गाने युरिक ऍसिड योग्य प्रमाणात बाहेर पाडण्यासाठी किडनी चे कार्य व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. शरीरात भरपूर प्रमाणात पाणी असणे हे किडनी चे कार्य सुधारते. यामुळे किडनी अपेक्षित त्या प्रमाणात युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकते.
  • किडनी मध्ये होणारे १० टक्के किडनी स्टोन हे युरिक ऍसिड किडनी मध्ये जमा झाल्यावर होतात. पण जर शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असेल तर हे युरिक ऍसिड चे खडे तयार होण्याची शक्यता कमी होते.
  • युरिक ऍसिड बाहेर फेकण्यासाठी रक्ताची ph वॅल्यू ही अल्कलाइन असावी लागते. रक्ताची ऍसिडिक ph वॅल्यू ही युरिक ऍसिड बाहेर फेकण्यासाठी पूरक नसते. म्हणून जेव्हा रक्ताची ph ऍसिडिक असते तेव्हा जास्त प्रमाणात असलेले पाणी त्याला अल्कलाइन करून युरिक ऍसिड बाहेर फेकण्यास मदत करते.

सिडिसी नुसार अधिक पाणी पिल्यामुळे संधीरोगात होणाऱ्या वेदना कमी होतात. रक्तातील युरिक ऍसिड जेव्हा शरीराच्या जोइंटस मध्ये जाऊन जमा होते तेव्हा संधि रोग (gout) आजार होत असतो.

त्यामुळे संधि रोग असणाऱ्या व्यक्तींनी सतत पाणी प्यावे असा सल्ला तज्ञ देत असतात.

२. कॉफी प्या

शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी कॉफी प्या

कॉफी चे सेवन केल्याने सुद्धा रक्तातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.

या रिसर्च नुसार संधि रोग मध्ये वाढलेले रक्तातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मध्यम प्रमाणात कॉफी पिणे गरजेचे आहे सांगितले आहे. याच रिसर्च मध्ये असे ही सांगितले आहे की संधीरोग चा धोका टाळण्यासाठी रोज एक कप कॉफी पिणे फायदेशीर ठरते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित रिसर्च मध्ये कॉफी चे सेवन रक्तातील युरिक ऍसिड कमी करते यासाठी पुरेसे पुरावे देखील उपलब्ध आहेत.

यामधे तुम्ही किती प्रमाणात कॉफी सेवन केले पाहिजे याबद्दल वेगवेगळे मत असू शकते. तरी देखील उपलब्ध असणारे पुरावे आणि अभ्यासानुसार मध्यम प्रमाणात कॉफी सेवन केल्याने रक्तातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.

रक्तातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी कॉफी कशी मदत करू शकते याबद्दल ची थोडी माहिती जाणून घेऊया.

  • कॉफीमध्ये कॅफीन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात लगवी तयार होत असते. त्यामुळे साहजिकच जास्त लगवी तयार होऊन त्यामध्ये जास्त प्रमाणात युरिक ऍसिड मिसळले जाईल आणि बाहेर पडेल.
  • कॉफी नॉर्मली अम्लीय (acidic) असली तरी काही अभ्यासानुसार कॉफी अल्कलाइन प्रभाव देखील दाखवू शकते. शरीराच्या या अल्कलाइन (alkaline) वातावरणात युरिक ऍसिड जास्त प्रमाणात बाहेर फेकल्या जाते.
  • तसेच कॉफी मध्ये असलेल्या कॅफीन ची रचना ही काही प्रमाणात ऍलोप्युरिनॉलसारखी (allopurinol) असते. हे ऍलोप्युरिनॉल संधीरोगात वाढलेले युरिक ऍसिड कमी करते. त्यामुळे कॉफी चे कार्य हे ऍलोप्युरिनॉलसारखी आहेत असे मानायला हरकत नाही.

वरील सर्व कॉफी चे फायदे हे शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मदत करतात.

काही लोक कॉफी मध्ये असलेल्या कॅफीन मुळे याचा हा फायदा मिळतो म्हणून या हेतु साठी चहा सेवन करतील. पण त्याचा काही फायदा होणार नाही. जसा कॉफी पिण्याचा फायदा हा रक्तातील युरिक ऍसिड बाहेर काढण्यासाठी केला जातो तसा चहा चा उपयोग यासाठी होत नाही. रिसर्च नुसार युरिक ऍसिड कमी करण्यासाठी चहा चा उपयोग होतो असे कुठेच आढळलेले नाही.

जपान मध्ये या रिसर्च नुसार दिवसाला पाच कप कॉफी पिणाऱ्यांच्या रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी झाल्याचे आढळलेले आहे. या रिसर्च नुसार २२४० लोकांमध्ये कॉफी चे सेवन आणि युरिक ऍसिड यांचा संबंध अभ्यास करण्यासाठी प्रयोग करण्यात आला होता. यानुसार ज्या लोकांनी १ कप कॉफी चे सेवन केले त्यांच्या रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण अधिक आढळले. दुसऱ्या बाजूने दिवसाला पाच कप पिणाऱ्या लोकांमध्ये कमी युरिक ऍसिड चे प्रमाण आढळले.

३. फायबर डायट घ्या

शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी फायबर युक्त आहार घ्या

फायबर युक्त आहार जसे की केळी, सफरचंद, डाळी, गोबी आणि इतर, यांमुळे सुद्धा रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी करायला मदत होते. फायबर हा आपल्या आहारातील एक महत्वाचा पोषक घटक आहे.

या फायबर चे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. महत्वाचा फायदा म्हणजे हे फायबर ह्रदयासाठी आणि एकंदरच ह्रदय विषयक आजारांना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते असते.

आता अनेक संशोधनात हे फायबर शरीरातील युरिक ऍसिड प्रमाण कमी करण्यास सुद्धा मदत करते असे सिद्ध झाले आहे.

२०१९ मधील या रिसर्च नुसार फायबर डायट हा रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण हे लक्षणीयरीत्या कमी करते.

  • रिसर्च नुसार आहारातील फायबरद्वारे प्युरिन युक्त आहाराचे अधिक शोषण होणे थांबते ज्यामुळे प्युरिन पासून तयार होणारे युरिक ऍसिड देखील तयार होत नाही.
  • फायबर घटक हा तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तसेच तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. पचनक्रिया चांगली असेल तर त्यामधून सहाजिक योग्य प्रमाणात युरिक ऍसिड कमी तयार होईल आणि बाहेर फेकल्या जाईल. यामुळे अधिक फायबर युक्त आहार घेऊन पचनक्रिया चांगली ठेवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे.
  • काही फायबर युक्त आहार जसे केळी, सफरचंद हे अल्कलीन (alkaline) असतात ज्यामुळे शरीरातील युरिक ऍसिड हे कमी होण्यासाठी मदत होते.
    जेवढे फायबर युक्त फळे, भाज्या आहेत, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ज्यामुळे किडनी चे देखील कार्य सुधारते आणि जास्त प्रमाणात युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकण्यास मदत होते.

या सर्व गोष्टी विचारात घेता युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय करण्याबरोबर फायबर चा उपयोग किती महत्वाचा आहे हे लक्षात येते.

फायबर युक्त पदार्थ कोणते ?

युरीक अॅसिड चे प्रमाण कमी करण्यासाठी फायबर युक्त आहार जसे सर्व प्रकारचे धान्य, शेंगा, फळे, हिरव्या भाज्या तुमच्या जेवणात समाविष्ट करा.

४. वजन कमी करा

शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी वजन कमी करा

रक्तातील युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय बघत असताना त्या दृष्टीने वजन कमी करणे देखील खूप गरजेचे आहे. वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकण्यास अडचण ठरत असते.

हा उपाय ज्यांचे वजन जास्त आहे, लठ्ठपणा आहे अशा व्यक्तींसाठीच उपयोगी ठरणार आहे.

संबंधित वाचा-वजन कमी करण्याससाठी आयुर्वेदिक औषधे

कारण अशा व्यक्तींमध्येच शरीरात असे काही बदल होतात जे रक्तातील युरिक ऍसिड वाढवण्यास मदत करत असतात.

वजन वाढल्यानंतर शरीरात अधिक चे अडिपोज टिशू (adipose tissue) जमा होतात. तज्ञांचे मत आहे की हे अडिपोज टिशू सुद्धा नंतर युरिक ऍसिड तयार करू शकतात. त्यामुळे नॉर्मल तयार होणारे युरिक ऍसिड आणि अडिपोज टिशू मधून तयार होणारे युरिक ऍसिड, हे दोन्ही मिळून एकंदर शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण खूप वाढवते. किंबहुना वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये वाढलेल्या युरिक ऍसिड साठी अडिपोज टिशू हा महत्वाचा जबाबदार घटक मानला जातो.

हेल्थलाइन नुसार लठ्ठपणा किंवा अनियंत्रित वजन यामुळे शरीरात युरिक ऍसिड जमा होऊन संधीरोग निर्माण होतो.

रिसर्च मध्ये असे आढळून आले की वाढलेले युरिक ऍसिड आणि शरीरातील चरबी यांचा प्रत्यक्ष संबंध येतो ज्यामुळे रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण ठरते. यामुळे वाढलेली चरबी हे शरीरातील युरिक ऍसिड चे प्रमाण ठरवते असे आपण म्हणू शकतो.

संबंधित वाचा –वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

लठ्ठपणा मुळे तुमच्या किडनी च्या कार्यावर देखील परिणाम होतो. ज्यामुळे किडनी योग्य प्रमाणात युरिक ऍसिड बाहेर फेकू शकत नाही. तसेच खालील काही कारणे शरीरातील अधिकचे युरिक ऍसिड कमी करतात.

५. युरिक ऍसिड कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय हे आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार आतापर्यंत आपण बघितले . या भागात आपण आयुर्वेदनुसार युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय याची माहिती बघणार आहोत.

  • वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीराची लवचिकता वाढते ज्यामुळे साहजिकच शरीराचा रक्तप्रवाह (blood circulation) देखील सुधारतो. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे जास्त प्रमाणात रक्ताचे filtration होऊन त्यातून लागवी तयार होईल. या लगवीतूनच युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकल्या जाईल.
  • व्यायामामुळे इंसुलिन सेनसीटीविटी (insulin sensitivity) देखील वाढते. ज्यामुळे असे मानले जाते की शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण देखिल नियंत्रित होते.
  • व्यायामामुळे शरीरातील chronic inflammation कमी होते. यामुळे शरीराची युरिक ऍसिड बाहेर फेकण्याची क्षमता देखील वाढते.
युरिक ऍसिड कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

१. त्रिफळा

आयुर्वेद मध्ये त्रिफळा औषधी ही अनेक आजारांसाठी सर्वात जास्त वापरली जाणारी एक आयुर्वेदिक औषधी आहे. त्रिफळा मध्ये आमळकी, हरीतकी आणि बिभितकी अशा तीन आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश असतो.

त्रिफळा एक स्ट्रॉंग anti-inflammatory औषधी म्हणून काम करते. यामुळे त्रिफळा शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी एक प्रभावी औषध ठरते. कारण संधीरोग पण हा एक प्रकारचा inflammatory आजार आहे.

त्यामुळे युरिक ऍसिड वाढल्यावर येणारी सूज आणि दाह हे त्रिफळा मुळे कमी होते.

२. गिलोय (गुडूची)

गिलोय ही देखील आयुर्वेदनुसार ‘वातरक्त’ म्हणजेच संधि रोग आजारात वापरली जाणारी एक वनस्पति आहे.

फायटोजर्नल मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार गिलॉयच्या खोडा चा अर्क हा संधीरोगात वाढलेल्या युरिक ऍसिड चे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

तसेच यामध्ये anti-inflammatory गुणधर्म असल्यामुळे सूज आणि वेदना देखील गिलोय मुळे कमी होण्यास मदत होते.

३. हळद

तुम्ही जर रोज हळदीची पेस्ट करून सुजलेल्या संधीरोग झालेल्या ठिकाणी लावली तर तुम्हाला आराम मिळू शकतो. याचमुळे हळद ही तुमच्या शरीरात वाढलेल्या युरिक ऍसिड चे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

हळदी मध्ये आढळणारे कर्क्यूमिन (curcumin) हे कंपाऊंड संधीरोगासाठी एक उत्कृष्ट उपचार म्हणून आहे असे २०१६ च्या एका अभ्यासात सिद्ध झालेले आहे.

आयुर्वेद नुसार संधि रोगासाठी अनेक उपयुक्त असे उपाय आहेत. पण त्यासाठी लागणारे वैज्ञानिक पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत.

तरी ही तुम्ही आयुर्वेद डॉक्टरांना तुमच्या समस्याविषयी बोलून तुम्ही त्यावर योग्य तो आयुर्वेदिक उपचार चालू करू शकता.

थोडक्यात

शेवटी आपण सर्व समजून घेऊया.

  • शरीरातील युरिक ऍसिड हे ८० टक्के लगवी द्वारे शरीराबाहेर फेकल्या जाते. यामुळे तुमच्या लागवी चे प्रमाण वाढवण्याकडे लक्ष्य द्या.
    यासाठी भरपूर पाणी प्या आणि फायबर युक्त आहार सेवन करा.
  • दुसरे म्हणजे लगवी तयार करण्याचे काम हे किडनी चे असल्यामुळे तुम्हाला किडनी कडे देखील लक्ष द्यावे लागले. किडनी चे आरोग्य आणि कार्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवा.
  • युरिक ऍसिड चे प्रमाण कमी ठेवण्याचा दूसरा मार्ग म्हणजे फायबर युक्त आहार जास्त घेत जा, वजन कमी करा.
  • सुरक्षित आणि प्रभावी औषधोपचार घ्यायचे असतील तर आयुर्वेदिक औषधांचा विचार करा. यामधे हळद, त्रिफळा, गुडूची आणि अद्रक असणाऱ्या औषधांचा उपयोग करू शकता.

जर तुम्हाला युरिक ऍसिड कमी करण्यासाठी हे उपाय आवडले असतील, माहिती आवडली असेल तर मला कळवू शकता. धन्यवाद.

FAQ’s

युरिक ऍसिड वाढल्यास कोणती फळे खावीत ?

युरिक ऍसिड वाढल्यास केळी, सफरचंद, टरबूज, संत्री अशी फळे खावीत.

युरिक ऍसिड जास्त असल्यास कोणती फळे टाळावीत?

युरिक ऍसिड जास्त असल्यास शक्यतो आंबट फळे टाळावीत.

कोणत्या पदार्थांमध्ये प्युरीन असते?

प्युरीन हे मांसाहार, अंडी आणि काही भाज्यामद्धे असते.

गाउट कशामुळे होतो?

गाउट हा आजार युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त होऊन ते जोइंटस च्या ठिकाणी जमा झाल्यामुळे होतो.

संधिरोग बरा होऊ शकतो का?

हो, संधीरोग हा बरा होऊ शकतो.

Leave a Comment