मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी ? 30 दिवसांचे संपूर्ण नियोजन

आपल्या परिवारातील काही सदस्यांची वयाच्या ठराविक काळामध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागते. पण मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी ती माहिती त्यांना नसते.या ब्लॉग मध्ये आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी (precautions after cataract surgery) याची सविस्तर माहिती बघणार आहोत.

Contents

डोळा हा तुमच्या शरीरातला सर्वात सुंदर,नाजुक आणि महत्वाचा अवयव असतो. पण याच डोळ्यामध्ये जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा संपूर्ण आयुष्यच धूसर होऊन जाते. अशा वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे मोतीबिंदू ऑपरेशन करणे याशिवाय दूसरा पर्याय तुमच्याकडे नसतो.

पण तुम्हाला माहितेय का की मोतीबिंदू ऑपरेशन करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे आहे ऑपरेशन नंतर त्या डोळ्यांची काळजी घेणे.

कारण मोतीबिंदू चे ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गुंतगुंती (complications) होतात त्यामध्ये 40 टक्के घटना या योग्य काळजी न घेतल्यामुळे होतात.

गे अगदी तसंच आहे जसं नवीन रोप लावल्यावर त्याची काळजी घेतली नाही तर ते रोप कोमेजून जाते. मोतीबिंदू ऑपरेशन मध्ये सुद्धा तुमच्या डोळ्यात एक नवीन लेन्स बसवली जाते ज्याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागते.

पण अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, आणि परिणामी, शस्त्रक्रियेनंतर अनेक प्रकारच्या गुंतगुंती होऊन बसतात.

म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या सर्व व्यक्तींनी त्या अनुषंगाने डोळ्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

पण काय आहे ती काळजी ? कशी घ्यायची ती काळजी ? डोळ्यांना योग्य आराम कसा द्यायचा, कोणते पथ्य पाळायची, आणि कोणते सवयी बदलणे गरजेचे आहे? याच सर्व गोष्टींची माहिती शोधते का ?

या ब्लॉग मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते बदल करावे, टाळावे याबद्दल सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

त्यापूर्वी, जस की मी प्रत्येक ब्लॉग मध्ये त्या टॉपिक विषयी काही मूलभूत, सामान्य माहिती देत असतो त्याप्रमाणे या टॉपिक बद्दल ही काही माहिती थोडक्यात बघू या.

मोतीबिंदू कशामुळे होतो किंवा मोतीबिंदू म्हणजे काय ?

मोतीबिंदू ही एक डोळ्याची सामान्य स्थिति.

आपल्या डोळ्या च्या समोरील भागात एक लेन्स असते. ही लेन्स पारदर्शक असते. या लेन्स वर प्रकाश केंद्रित होऊन लेन्स च्या मागे असणाऱ्या रेटिना (retina) वर पडतो आणि आपल्याला वस्तु दिसतात.

पण काही कारणाने ती लेन्स धुकी किंवा आंदक पडते आणि त्याचा परिणाम आपल्या दृष्टीवर होतो.

मोतीबिंदू लक्षणे

यामुळे आपली

  • दृष्टी खराब होते.
  • अंधुक होते, कमी दिसते.
  • तसेच रात्री दिसण्यास अडचण होणे.

अशा प्रकारच्या समस्या चालू होतात.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया (मोतीबिंदू ऑपरेशन) नंतर काय होते ?

खराब झालेली लेन्स शस्त्रक्रिया दरम्यान डोळ्यामध्ये चीर देऊन काढून घेतात आणि त्या जागेवर नवीन लेन्स बसवतात. यामुळे तुमची दृष्टी पुन्हा पूर्ववत होते आणि तुम्हाला चांगले दिसायला लागते.

नवीन बसवली जाणारी लेन्स ही कृत्रिम लेन्स असते. तिला IOL (intra ocular lens) असे म्हणतात.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी लागणारे लेन्स

मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी

यामध्ये आपण जी खबरदारी किंवा काळजी घ्यायची आहे त्याचे दोन भाग करून बघूया. पहिला भाग असेल तो मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच ज्या गोष्टींची काळजी घ्यायची तो आणि दूसरा भाग म्हणजे ऑपरेशन नंतर एक वर्ष होई पर्यन्त घ्यायची काळजी.

1. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच घ्यायवयाची काळजी

मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर लगेचच घ्यावयाची काळजी

A. डोळ्यांचे ड्रॉप वापरा

मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर काय काळजी घ्यावी याची माहिती घेत असताना ड्रॉप विषयी न सांगणे चुकीचे ठरेल.

तुमची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्रास, जळजळ किंवा काही इन्फेक्शन होऊ नये या अनुषंगाने तुम्हाला काही डोळ्यात टाकायचे ड्रॉप दिले जातात. हे डोळ्यांचे ड्रॉप तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेळेवर आणि तेवढ्याच प्रमाणात डोळ्यात टाकायची आहे.

हे डोळ्यांचे ड्रॉप वापरल्यावर जर तुम्हाला काही त्रास, रिएक्शन किंवा दुष्परिणाम जाणवत असतील तर ड्रॉप टाकणे लगेच थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांना याबद्दल कल्पना द्या.

B. औषधोपचार घेणे

ड्रॉप शिवाय डॉक्टर तुम्हाला काही औषधी ही देऊ शकतात. ही औषधे तुम्हाला डोळ्याचा त्रास होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये आणि त्या ठिकाणी आलेली सूज आणि जखम कमी व्हावी यासाठी दिलेली असतात. ही देखील तुम्ही वेळेवर आणि योग्य प्रमाणात घेतलीच पाहिजे.

या बाबत दुर्लक्ष केल्यास डोळ्याची आग होणे, सूज आणि तेथील जखम कमी न होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गोळ्या औषध वेळेवर आणि सांगितलेल्या प्रमाणात घेऊन होणारे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता.

बेस्ट आय केअर सप्लीमेंट

C. विश्रांती

मोतीबिंदू शास्त्रक्रियेनंतर तुम्हाला विश्रांती घ्यायचा सल्ला हा हमखास दिला जातो. या मागे उद्देश्य म्हणजे विश्रांती च्या स्थिति मध्येच तुम्हाला दिलेली औषधोपचार आणि ड्रॉप या गोष्टी लवकर आणि अधिक प्रभावीपणे काम करतात.

याच बरोबर विश्रांती घेतल्यावर तुमची healing process (जखम भरून येण्याची प्रक्रिया)लवकर होते. यामुळे तुमच्या डोळ्याच्या ठिकाणी आलेली सूज आणि जखमा लवकर भरून निघतात.

D. डोळ्यांचे संरक्षण

तुमचा डोळा हा खूप नाजुक अवयव आहे आणि त्याहून ही नाजुक तुमच्या डोळ्याच्या लेन्स आहेत. त्यामुळे अर्थातच तिथे जखम देऊन जर शस्त्रक्रिया केली असेल तर त्याची काळजी आणि संरक्षण करावेच लागेल.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला एक चश्मा वापरण्यासाठी देतात. तो चश्मा डोळ्यांच्या संरक्षणासाठी असतो. तो तुम्ही नेहमी वापरायचा आहे.

त्याच सोबत डोळ्यांवर ताण पडेल जसे की,

  • मोबाइल बघणे.
  • टीव्ही बघणे.
  • सूर्याकडे जास्त वेळ बघत राहणे.
  • उन्हात जास्त वेळ फिरणे.

अशा गोष्टी करणे टाळा. तसेच जिथे धूर असेल त्या ठिकाणी देखील जाण्याचे टाळावे.

याच सोबत तुम्हाला जास्त कठोर हालचाल देखील करायच्या नाहीत. जसे की,

  • व्यायाम करणे
  • वाकणे
  • जड वस्तु उचलणे
  • ओरडणे
  • जोरात हसणे.

असे केल्यास तुमच्या डोळ्यांवर ताण पडून (intraocular pressure) लेन्स ला इजा होण्याची शक्यता असते.

E. फेरतापासणी

शस्त्रक्रिया होऊन सुट्टी झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला पुन्हा भेटीसाठी म्हणजे फेरतापासणी साठी बोलावतात. याला आम्ही डॉक्टर follow up म्हणत असतो.

जेव्हा जेव्हा डॉक्टर तुम्हाला फेरतापासणी साठी बोलवतील तेव्हा तुम्ही नक्कीच जायचे आहे. यामध्ये डॉक्टर तुमचे निरीक्षण, तपासणी करून तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतात. त्याच सोबत तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही सांगून त्याबद्दलचे मार्गदर्शन घेऊ शकता.

2. शस्त्रक्रियानंतर जीवनशैलीत बदल

शस्त्रक्रियानंतर लगेचच घ्यायवायची काळजी आपण बघितली. या व्यतिरिक्त तुम्हाला शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही महीने किंवा वर्ष एवढ्या काळासाठी काही खबरदारी घ्यावी लागते. या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतात.

हे सुद्धा वाचा- हाताला मुंग्या येताय? इथे बघा उपचार

मोतीबिंदू शस्त्रक्रिया नन्यत्र जीवनशैलीत करावयाचे बदल

त्या संबंधीची माहिती आपण आता बघूया.

A. आहार विषयक बदल

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल जेणेकरून पुढे चालून पुन्हा मोतीबिंदू होऊ नये आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील.

याच सोबत शस्त्रक्रिया दरम्यान झालेली जखम आणि सूज भरून काढण्यासाठी आणि एकंदर डोळ्याच्या दृष्टीच्या आरोग्यासाठी तुम्हाला डोळ्यासाठी पोषक असा आहार घ्यायचा आहे.

यामध्ये आपण डोळ्यासाठी पोषक अशी तत्वे असणारी गाजर, सफरचंद, केळी, हिरव्या पालेभाज्या, डाळी हा आहार घेऊ शकतो.

B. डोळ्यांची स्वच्छता

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही महीने तुम्हाला डोळ्याची स्वछता ठेवायची आहे.

जसे की हात स्वछ धुतलेली असेल तरच डोळ्यांना हात लावायचे, विनाकारण डोळ्यांना स्पर्श करायचा नाही, डोळ्यांना खाज आल्यास wipes घेऊन डोळे पुसायचे आहेत.

C. जळजळ घटकांपासून बचाव

शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस डोळ्यांना जळजळ करणाऱ्या घटकांपासून वाचवायचे आहे. जसे की रासायनिक फवारे, धूर, धूळ. यामुळे बाहेर जाताना तुम्ही sunglass किंवा डॉक्टरांनी दिलेला चश्मा वापरु शकता.

वरील सर्व खबरदारी घेऊन तुम्ही शस्त्रक्रिया पश्चात होणारा त्रास टाळू शकता.

यानंतर आपण शस्त्रक्रिया संदर्भात अजून दोन घटकांची माहिती बघूया.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर स्वाभाविक होणारा त्रास

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर थोडीशी अस्वस्थता, अंधुक दृष्टी आणि प्रकाशाची संवेदनशीलता अनुभवणे सामान्य आहे. तरी, डोळ्यांना आराम मिळाल्यावर ही लक्षणे सहसा काही कमी होतात. यासोबत हे ही लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीचा बरा होण्याचा कालावधी कमी अधिक असू शकतो.

मोतीबिंदू शास्त्रक्रियेनंतर होणारे complications

मोतीबिंदू ही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे. शस्त्रक्रिया केल्यावर कुठलेही आरोग्य विषयक उपद्रव म्हणजे side effects होत नाहीत. पण काही लोकांमध्ये तीव्र वेदना, दृष्टी बिघडत राहणे, सतत डोळ्यांना लालसरपणा किंवा सूज येणे अशा गुंतागुंती उद्भवू शकतात. अशी किंवा इतर कोणतेही दुष्परिणाम किंवा गुंतागुंती जाणवल्यावर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना भेटा.

थोडक्यात

शेवटी, ब्लॉग मध्ये आपण मोतीबिंदू ऑपरेशन नंतर कोणती महत्त्वाची काळजी घ्यावी आणि ती घेणे का महत्वाची आहे याची माहिती बघितली. अर्थातच यामुळे तुम्हाला मोतीबिंदू ऑपरेशन नंतर सामान्यपणे होणाऱ्या गुंतगुंती किंवा साइड इफेक्ट होणार नाहीत. झाल्याच तर लवकर तुमच्या जवळच्या तज्ञ डॉक्टरांना त्याविषयी सांगायचे आहे.

ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’S

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर किती दिवस विश्रांतीची गरज आहे?

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे 2-4 दिवसांच्या विश्रांतीची गरज असते. तरी देखील तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक तेवढी विश्रांती घेणे गरजेचे आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सर्वात सामान्य गुंतागुंत कोणती आहे?

मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सर्वात सामान्य गुंतागुंत म्हणजे डोळ्यांची जळजळ होणे आहे.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मी माझा जुना चष्मा लावावा का?

अजिबात नाही. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा जुना चष्मा शक्यतो लावू नका. कारण ऑपरेशन नन्यत्र नवीन दृष्टी येत असते. यामुळे सहाजिक तुमच्या चष्म्या चा नंबर देखील बदलेल.

मोतीबिंदूच्या लेन्स खराब होऊ शकतात का?

नक्कीच. मोतीबिंदूच्या लेन्स खराब होऊ शकतात कारण त्या कृत्रिम असतात.

तुम्ही तुमच्या डोळ्यात लेन्स बदलू शकता का?

नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यात लेन्स बदलू शकत नाही. ही लेन्स शस्त्रक्रिया करून बदलली जाते.

Leave a Comment