मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय, मासिक पाळी येण्यासाठी उपाय, मासिक पाळी येण्यासाठी काय करावे, मासिक पाळी येण्यासाठी गोळी, मासिक पाळी येण्यासाठी टॅब्लेट, मासिक पाळी लवकर येण्यासाठी, मासिक पाळी वेळेवर येणे. (masik pali yenyasathi upay, masik pali lavkar yenyasathi upay, masik pali lavkar yenyasathi tablet, masik pali yenyasathi gharguti upay, masik pali regular yenyasathi upay, masik pali regular yenyasathi upay in marathi, masik pali niyamit yenyasathi marathi, masik pali niyamit yenyasathi upay)
मासिक पाळी स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाची नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या मासिक पाळी चे अनेक आरोग्य फायदे आहेत जर ती नियमित आणि नैसर्गिक असेल तर. पण अनेक स्त्रियांना अनियमित मासिक पाळी ची समस्या असते. सुदैवाने मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय आहेत.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय काही काळासाठी केल्यास नक्कीच महिलांची मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होणार आहे.
या ब्लॉग मध्ये अत्यंत फायदेशीर आणि शास्त्रीय दृष्ट्या योग्य असे मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत.
तुमची मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय
1. दालचीनी
आपल्या स्वयंपाकघरात दैनंदिन वापर असणारा एक घटक म्हणजे दालचीनी. पूर्वी काळापासून दालचीनी अनेक आरोग्य समस्यांवर औषधी म्हणून वापरली जाते आहे. दालचीनी रक्तातील साखरेचे नियंत्रण करते म्हणजेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी दालचीनी औषध म्हणून काम करते.
तसेच तुम्ही जर मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर दालचीनी हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
याचबरोबर रक्त भिसरण म्हणजेच blood circulation सुधारण्यासाठी मदत करते. यामुळे ह्रदयरोग आणि ह्रदयासंबंधीत आजारांसाठी सुद्धा दालचीनी चा उपयोग होतो. छाती मध्ये जळजळ असल्यास देखील दालचीनी जळजळ कमी करते.
अजून एक दालचीनी चा महत्वाचा उपयोग म्हणजे मासिक पाळी नियमितता करण्यासाठी.
2014 मध्ये झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले की PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असणाऱ्या महिलांमध्ये दालचीनी मासिक पाळी नियमित करते.
त्याचबरोबर 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा निष्कर्ष आहे की primary dysmenorrhea चा आजार असलेल्या स्त्रियांमध्ये वेदना आणि पोटाची जळजळ दालचीनीच्या वापराने कमी झाली. यामध्ये दालचीनी नियमित मासिक पाळी सुधारते असा निष्कर्ष नाही पण त्यासंबंधित वेदना आणि जळजळ अशा समस्या दालचीनी चा दैनंदिन उपयोग केल्याने कमी होतात.
खाली दिलेल्या काही फॅक्टस मुळे दालचीनी मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करते असे सिद्ध होते.
- दालचीनी इंसुलिन सेनसीटीविटी सुधारून त्यामुळे होणारे होरमोनल इमबॅलेंस सुधारते.
- दालचीनी मध्ये सिनामीक अॅसिड (Cenemic acid) नावाचे कंपाऊंड असते जे anti-inflammatory म्हणून काम करते. यामुळे बीज ग्रंथी किंवा गर्भाशय या ठिकाणी असलेली सूज कमी होते आणि मासिक पाळी चा मार्ग मोकळा होतो.
- रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण म्हणजेच मधुमेह असेल तर मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोन्स तयार होत नाहीत. दालचीनी रक्तातील साखरेचे नियंत्रण करून मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करते.
अशा पद्धतीने दालचीनी मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयोगी ठरते.
हे सुद्धा वाचा- मासिक पाळी नेमके किती दिवस उशिरा येऊ शकते?
यासाठी मासिक पाळी अनियमिततेचा त्रास असणाऱ्या महिलांनी आपल्या रूटीन मध्ये दालचीनी चा उपयोग करणे गरजेचे आहे.
या पद्धती वापरुन तुम्ही दैनंदिन दालचीनी चा उपयोग करू शकता.
- तुमच्या भाजी मध्ये दालचीनी चा उपयोग वाढवा.
- एक कप गरम पाण्यात एक चमचा दालचीनी टाकून तुम्ही दालचीनी चहा करून पिऊ शकता.
- दालचीनी कॅप्सुल किंवा टॅब्लेट घ्या.
वरील कोणत्याही एका पद्धतीने तुमच्या रुटीन मध्ये दालचीनी चा उपयोग करू शकता.
2. अननस (pinneapple)
गोड आणि थोडी आंबट चव असणारे अननस आपल्या सर्वांचे आवडते फळ आहे. हे फळ औषधी म्हणून देखील काम करते हे खूप कमी लोकांना माहीत असावे.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय बघत असताना अननस पर्याय वगळून चालणार नाही.
भरपूर प्रमाणात vitamins, minerals आणि antioxidant असणारे हे फळ आहे. त्याचबरोबर मासिक पाळी नियमित करण्यासाठी सुद्धा अननस उपयोगी ठरते.
अननस प्रत्यक्षरीत्या मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयोगी ठरते असे नाही पण त्यामुळे मिळणारे फायदे हे मासिक पाळी नियमित करण्यासाठी नक्कीच मदत करतात.
अननस मध्ये ब्रोमेलेन (bromelain) नावाचे enzyme असते ज्यामध्ये anti-inflammatory आणि anticlotting गुणधर्म असतात. या ब्रोमेलेन enzyme मुळे जे फायदे मिळतात त्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यासाठी मदत होते असे मानले जाते.
- अननस गर्भाशयाची आतमधील लेयर म्हणजेच uterine linning सॉफ्ट करते ज्यामुळे अनियमित मासिक पाळी येणाऱ्या महिलांमध्ये नियमित मासिक पाळी येण्यासाठी वातावरण निर्मित होते.
- गर्भाशय आणि बिजकोष ची सूज आणि इन्फेक्शन कमी करते.
- गर्भाशयाला रक्तपुरवठा करते ज्यामुळे गर्भाशय चे कार्य व्यवस्थित पार पडू शकेल.
आशा सर्व माध्यमातून अननस नियमित मासिक पाळी येण्यासाठी उपयोगी ठरत असते.
हे सुद्धा वाचा- मासिक पाळी न आल्यास काय करावे?
अशा या अननस चा उपयोग अनेक पद्धतीने सेवन करून करू शकता.
- ताजे अननस आणून खा किंवा दहयात नाहीतर दुधात टाकून घ्या.
- अननस आणून त्याचा रस करून पिऊ शकता.
- ब्रोमेलेन साठी त्याची कॅप्सुल आणि टॅब्लेट भेटते, त्याचा ही उपयोग करू शकता.
हे सुद्धा वाचा- लेमन ज्यूस चे मासिक पाळी वर परिणाम
3. पपई (papaya)
पपई देखील मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करू शकते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय करत असताना अनेक जण पपई चा उपयोग नक्की करत असतील.
पपई मध्ये carotene नावाचे एक घटक असते जे ईस्ट्रोजन (estrogen) हॉरमोन तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. ईस्ट्रोजन हॉरमोन मासिक पाळी नियमित राहण्यासाठी महत्वाचे हॉरमोन आहे.
त्याशिवाय इतर पद्धतीने पपई मासिक नियमित करण्यासाठी मदत करते.
- Carotenoids हे anti-inflammatory आणि antioxidant असल्यामुळे गर्भाशय आणि बिजकोशातील इन्फेक्शन आणि इतर सूज कमी करून नियमित मासिक पाळीसाठी चांगले वातावरण बनवते.
- पपई मध्ये असणारे विटामीन E आणि विटामीन C हे antioxidant म्हणून काम करते. यामुळे मासिक पाळी साठी अडथळा ठरणारे toxins शरीराबाहेर फेकण्यास मदत होते.
- यामध्ये असणारे फायबर पचनशक्ती निरोगी ठेवून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
हे सुद्धा वाचा –मासिक पाळी चुकल्यास काय करावे?
आता नियमित पणे तुम्ही पपई कशी घेऊ शकता ते बघूया.
- फ्रेश पपई आणून खाऊ शकता.
- पपई चे ज्यूस घेऊ शकता.
- Cariya papaya नावाची कॅप्सुल आणि टॅब्लेट भेटते, ती देखील घेऊ शकता.
4. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
ऍपल सायडर व्हिनेगर हे अंबलेल्या सफरचंद पासून बनवलेला एक अर्क असतो. याचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे मासिक पाळी नियमित करणे.
2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या एक अभ्यासात असे सांगितले की दररोज १५ मिलि ऍपल सायडर व्हिनेगर पिळयाने PCOS असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी ही नियमित होऊ शकते.
- ऍपल सायडर व्हिनेगर मध्ये acetic acid असते जे मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोन्स बॅलेन्स ठेवण्याचे काम करते.
- तसेच यामुळे गर्भाशय आणि बिजकोष या ठिकाणी अधिक रक्तपुरवठा होतो आणि गर्भाशय आरोग्य सुधारते. परिणामी मासिक नियमित व्हायला लागते.
असे हे मासिक पाळीसाठी उपयोगी ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला रोज घ्यायचे आहे.
- रोज एक ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घेऊन मिक्स करून प्यायचे आहे.
- सॅलड किंवा एखाद्या आवडत्या सूप मध्ये मिक्स करून घेऊ शकता.
- टॅब्लेट आणि कॅप्सुल मिळतात ते ही घेऊ शकता.
याची चव खूप कडू असते त्यामुळे काहींना घ्यायला त्रास होईल. ही समस्या दूर करण्यासाठी त्यात थोडे पाणी आणि साखर देखील टाकू शकता.
संबंधित वाचा- मासिक पाळी मध्ये सेक्स करावा की नाही ?
एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपाय
तुम्ही जर एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर ही माहिती तुम्ही जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याचे काही महत्वाचे कारणे आहेत. मासिक पाळी नियमित येण्यासाठी आपण घरगुती उपाय बघितले आहे. या घरगुती उपायांबद्दल काही रिसर्च झाले आहे. त्या अनुषंगाने आपण वरील घरगुती उपाय बघितले आहेत.
पण एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपयांबद्दल तुम्हाला खालील गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. इथे मी तुम्हाला एका दिवसात पाळी येण्यासाठी जे उपाय तुम्ही शोधत आहात त्याबद्दल तुमचा समज खोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण इतर ठिकाणी एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपाय सांगितले असले तरी त्यासाठी अचूक वैज्ञानिक पुरावे आणि शेवटी तुमच्या आरोग्याला प्राधान्य देणे हेच महत्वाचे ठरते.
चला तर मग याबद्दल चा समज बदलून टाकूया.
- कोणताही वैज्ञानिक पुरावा हे सिद्ध करू शकला नाही की एखादा उपाय एका दिवसात किंवा एवढ्या जलद पद्धतीने तुमची मासिक पाळी आणू शकतो.
- एवढ्या जलद गतीने मासिक पाळी येण्याची अपेक्षा ठेवण्याएवजी, मासिक पाळी उशिरा होत असल्याची कारणे आणि त्या अनुषंगाने त्यावर काही घरगुती उपाय किंवा उपचार केल्यास तुमची मासिक पाळी नैसर्गिक पद्धतीने नियमित होते.
- जरी पिढ्यान्पिढ्या एका दिवसांत पाळी येण्यासाठी काही घरगुती उपाय लोक करत असतील तर त्याचे तेवढे पुरेसए वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. थोडक्यात एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपायावर अजून तरी विज्ञान तेवढे विकसित होऊ शकले नाही.
- लक्षात असू द्या की मासिक पाळी ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया तर आहेच, पण त्याच बरोबर ती तेवढीच सुंदर आणि महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे घाईघाईने गोष्टी करण्याऐवजी, आपल्या शरीराचे पोषण करण्यावर, त्याची लय समजून घेण्यावर आणि आवश्यकतेनुसार तज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यावर लक्ष केंद्रित करा.
तेव्हा घाई-गरबड करून मासिक पाळी नियंत्रित करण्याऐवजी, मासिक पाळी नियमित राहण्यासाठी तुम्ही एकंदर संपूर्ण बाजूंनी विचार करा आणि तुमच्या दैनंदिन आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.
शेवट
मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय तर आहेच आणि काही अंशी ते प्रभावी देखील आहेत. पण शेवटी हे ही लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे, त्यामुळे जो उपाय एका व्यक्तीसाठी उपयोगी ठरेल तो दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा ठरेल असे नाही. विशेषकरून जर तुम्हाला दूसरा कोणताही आजार असेल किंवा कोणतेही इतर औषधोपचार चालू असतील तर हे उपाय वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळा प्रभाव दाखवू शकतात.
हे ही लक्षात घेणे महत्वाचे आहे की हे घरगुती उपाय बघून तुम्ही तुमचे कोणत्याही प्रकारचे उपचार बदलणे चुकीचे ठरेल.
तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेन्ट द्या किंवा इतर काही सल्ला द्यायचा असेल तर तो ही द्या. धन्यवाद.
FAQ’s
मासिक पाळी येण्याचे लक्षण कोणते ?
मासिक पाळी येण्याचे लक्षण म्हणजे योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे. त्याशिवाय इतर लक्षणे पोटदुखी, थकवा, मळमळ, डोकेदुखी, स्तनांमध्ये बदल, मूड स्विंग्स इत्यादी लक्षणे देखील दिसून येऊ शकतात.
मासिक पाळी त्वरित येण्यासाठी कोणती टॅब्लेट वापरली जाते ?
मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रोजेस्टेरॉन घटक असणारी टॅब्लेट वापरली जाते. तरी यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमची मासिक पाळी थांबवू शकता का ?
हो, तुम्ही तुमची मासिक पाळी थांबवू शकता.
एका दिवसात पाळी येण्यासाठी काय करावे ?
एका दिवसात पाळी येण्यासाठी कोणताही उपाय किंवा उपचार नाही.
या महिन्यात माझी मासिक पाळी इतकी हलकी का आहे ?
यासाठी गर्भधारणा, स्तनपान, होरमोनल टॅब्लेट, नैराश्य ही कारणे असू शकता.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747