मासिक पाळी किती दिवस असते ? मासिक पाळी बद्दल तुम्हाला हे माहितीच हवे

(मासिक पाळी किती काल टिकते, मासिक पाळी किती दिवस टिकते, मासिक पाळीचा कालावधी, masik pali kiti divas aste, masik pali kiti divas palave?)

Contents

मासिक पाळी किती दिवस असते यांचे उत्तर प्रत्येक स्त्री बाबतीत वेगवेगळे असते. मासिक पाळी साठी साधारण 25 ते 35 एवढे दिवस साधारण मानले जातात. याच दरम्यान मासिक पाळी ची लांबी असणे आवश्यक आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला मासिक पाळी किती दिवस असते या आणि यासंबंधित इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.

स्त्रियांच्या आयुष्यात मासिक पाळी ही संकल्पना आणि त्याहून स्पष्ट म्हणजे एक जैविक प्रक्रिया खूप महत्वाची आहे. अशा या परिपूर्ण आणि पवित्र अशा मासिक पाळी चे शारीरिक दृष्ट्या आणि एकंदर स्त्रियांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने अनेक फायदे आणि महत्व आहे.

पण तुमच्यापैकी बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी किती दिवस असते, असायला पाहिजे, याबाबत नोरमाल काय आणि अब्नॉर्मल काय याबद्दल स्पष्ट आणि अचूक माहीत नसणार आहे.

नेमके मासिक पाळी किती दिवस असते या महत्वाच्या प्रश्नावर हा ब्लॉग आहे. ब्लॉग मध्ये तुम्हाला मासिक पाळी किती दिवस असते, मासिक पाळी किती काळ टिकू शकते, त्यातली त्यात नियमित मासिक पाळी किती काळ टिकते, मासिक पाळी किती दिवस राहते या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

संबंधित वाचा- मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?

मासिक पाळी किती दिवस असते- थोडक्यात पण स्पष्ट

तुमची मासिक पाळी ही सतत बदलणारी आणि अनिश्चित अशी प्रक्रिया आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला येईलच किंवा एवढ्या दिवासाठीच येईल, याच तारखेला येईल आणि आल्यावर एवढीच ब्लीडिंग होईल याबद्दल सर्व काही अनिश्चितच आहे. याबद्दल कुणी ही ठराविक आणि नेमके सांगू शकत नाही.

कारण मासिक पाळी वर प्रभाव टाकणारे बरेच घटक असतात. जसे की तुमचे वय, तुमची मानसिक, शारीरिक स्थिति, तुमचे इतर आजार जसे की PCOD, तुम्ही जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर ते सुद्धा. या सर्व घटकांचा परिणाम तुमच्या मासिक पाळी वर होत असतो. असो.

मासिक पाळी किती दिवस असते याबद्दल सामान्यपणे सरळ, स्पष्ट आणि अचूक सांगायचे असेल तर तुमची मासिक पाळी ही २१ ते ३५ दिवसांच्या अंतराने, या दरम्यान कधीही येऊ शकते आणि ही पाळी २ ते ७ दिवस राहू शकते.

आता मासिक पाळी किती दिवस असते आणि ती किती दिवसाने येते याचे हे खूप ढोबळ उत्तर झाले. २१ ते ३५ दिवसांच्या अंतराने येते म्हटल्यावर तुम्हीच विचार करा इथे किती दिवसांचा फरक आहे.

तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की असेल की असे का ? आणि या दिवसांच्या दरम्यान कोणत्याही काळात मासिक पाळी येत असेल तर ते सामान्य आहे का किंवा किती उशीर झाला तर डॉक्टरांना दाखवावे हे ही प्रश्न नक्कीच पडले असतील.

या सर्व प्रश्नांची उत्तरे ब्लॉग मधील पुढच्या काही भागामध्ये तुम्हाला मिळेल.

इतर देशात मासिक पाळी किती दिवस असते ?

जागतिक स्तरावर अनेक देशातील महिलांच्या मासिक पाळी चे नमुने, त्याची लांबी आणि मासिक पाळी मधील स्त्राव किती दिवस राहतो यावर अनेक संशोधन झाले आहे. ऑफिस ऑन विमेन हेल्थ नुसार मासिक पाळी ची लांबी ही सरासरी 24-38 दिवसांच्या दरम्यान असू शकते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित आर्टिकल नुसार स्त्रियांची सरासरी मासिक पाळी ही २८ ते ३० दिवसांची असते. पण हा झाला स्त्रियांच्या सरासरी मासिक पाळी चा कालावधी.

याच आर्टिकल मध्ये इतर ही बरेच फरक आणि काही मुद्दे नमूद केले आहे. जसे की:

  • अमेरिका आणि कॅनडातील 77% महिलांची पाळी 25 ते 31 दिवसांची असते.
  • 65% ग्रामीण चीनी महिलांची मासिक पाळी 27 ते 29 दिवसांची असते.
  • 84% ऑस्ट्रेलियन महिलांची मासिक पाळी 26 ते 34 दिवसांची असते.
  • भारतातील महिलांची मासिक पाळी ही 24 to 38 दिवसांच्या दरम्यान आहे.

यावरुन तुम्हाला समजून आले असेल की मासिक पाळी च्या लंबी मध्ये किती फरक आणि तफावत ही जगभरातल्या स्त्रियांमध्ये आढळून येते.

पण तुम्हाला फक्त मासिक पाळी किती दिवस असते हे जाणून घेणे महत्वाचे नाही तर मासिक पाळी च्या लांबीमध्ये एवढा फरक का दिसून येतो हे माहिती जाणून सुद्धा घेणे महत्वाचे आहे. कारण तुमच्या बाबतीत जर मासिक पाळी कमी जास्त होत असेल, अपेक्षित वेळी मासिक येत नसेल तर नेमके यासाठी काय कारण असू शकते हे महत्वाचे ठरणार आहे. यासाठी आपल्याला अजून थोडी अधिकची माहिती बघावी लागणार आहे.

मासिक पाळी कशी चालते ?

मासिक पाळी कशी चालते ?

मासिक पाळी कशी चालते, मासिक पाळी चे चक्र कसे असते, या दरम्यान शरीरात अशा कोणत्या घटना घडतात ज्यामुळे तुमच्या योनीतून दर महिन्याला ब्लीडिंग होते याची माहिती तुम्हाला असायला हवी. ही माहिती जाणून घेतल्यावर तुम्हाला एकंदर मासिक पाळी किती दिवस असते, किती दिवस स्त्राव व्हायला पहिजे आणि कोणती समस्या आल्यावर डॉक्टरांना दाखवावे हे कळून येईल.

चला तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की मासिक पाळी कशी चालते.

कल्पना करा की तुमचे गर्भाशय एक आरामदायक खोली आहे. जिथे दर महिन्याला एक नवीन पाहुणा येणार असतो, तो पाहुणा म्हणजे संभाव्य स्त्रीबीज आणि पुरुषबीज (शुक्राणु) मिळून फलित झालेला गर्भ. दर महिल्याला येणारी मासिक पाळी म्हणजे, तुमच्या येणाऱ्या पाहुण्याला खोली स्वच्छ आणि तयार करून ठेवण्यासाठीची तयारी असते. अजून सविस्तर समजून घेऊया.

प्रक्रिया १

तुमची मासिक पाळी चालू होते ती तुम्हाला पाळी येण्याच्या पहिल्या दिवसापासून. तुमच्या पाळी चा पहिला दिवस हा त्या मासिक पाळी चा पहिला दिवस मानला जातो. जर स्त्रीबीज आणि पुरुष बीज फलित नाही झाले तर या स्टेज मध्ये गर्भाशयाचे अस्तर गळून पडते आणि पुन्हा पुढच्या संभाव्य गर्भधारणेसाठी पुन्हा खोली स्वच्छ तयार करण्यासाठी प्रक्रिया पुढील २८ दिवस चालू राहते.

प्रक्रिया २

यामधे तुमची मासिक पाळी संपून तुमच्या अंडाशय मध्ये बीजांड तयार करण्याची प्रक्रिया पुन्हा चालू होते. प्रत्येक महिन्याला एका अंडाशय मधून एक बीजांड तयार होऊन बाहेर पडत असते. या प्रक्रियेला ओव्हुलेशन (ovulation) म्हणतात. ओव्हुलेशन दरम्यान बाहेर पडलेले बीजांड जर शुक्राणु सोबत मिळाले तर त्या पासून फलित अंड गर्भाशयात येऊन तिथे पेरले जाते आणि पुढे त्याची वाढ होऊन गर्भ तिथेच तयार होतो.

ओव्हुलेशन दरम्यान काय होते ?

ल्युटेनिझिंग हार्मोन (luteinizing hormone) मुळे ओव्हुलेशन प्रक्रिया चालू होते. हे ल्युटेनिझिंग हॉरमोन अंडाशय मधून परिपक्व बीजांड ला दर महिन्याला बाहेर काढते. नंतर हे परिपक्व बीजांड फॅलोपियन ट्यूब (fallopian tube) मध्ये येते. याच वेळेला जर शुक्राणु चा प्रवेश झाला तर बीजांड आणि शुक्राणु मिळून त्यातून फलित अंडी तयार होते.

प्रक्रिया ३

या दरम्यान संभाव्य येणाऱ्या पाहुण्यासाठी खोली चांगली ठेवण्याचे काम चालू राहते. थोडक्यात तुमच्या गर्भाशयाचे अस्तर अधिक घट्ट केले जाते, तिथे रक्तवाहिन्या यांची झीज भरून काढल्या जाते आणि एकंदर गर्भाशय सशक्त आणि मजबूत केल्या जाते. जेणेकरून जर बीजांड आणि शुक्राणु मिळून त्यातून फलित अंडी तयार झाले तर त्याच्या गर्भासाठी पोषक वातावरण मिळू शकेल. आता येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्व काही तयार आहे असे म्हणता येईल.

प्रक्रिया ४

जर बीजांड आणि शुक्राणू यांचा संयोग झाला तर त्यापासून फलित अंड तयार होते होते. त्यानंतर फलित अंडाचे गर्भाशयाच्या घट्ट अस्तरात रोपण होते आणि तुमची गर्भधारणा सुरू होते. पुढे 9 महीने गर्भयची वाढ आणि त्याचे पोषण याच ठिकाणी होते.

प्रक्रिया ५

पण जर का बीजांड आणि शुक्राणू भेटले नाही तर स्वच्छ केलेली खोली पुन्हा पुढच्या वेळेस येणाऱ्या संभाव्य पाहुण्यासाठी नव्याने तयार करण्यासाठी जुन्या खोली चे सर्व सामान बाहेर फेकल्या जाते. म्हणजे पुन्हा गर्भाशयाचे अस्तर गळून पडते आणि त्या मुळे पुन्हा तुमची पाळी चालू होते.

अशी चालते तुमची मासिक पाळी. प्रत्येक महिन्यात संभाव्य गर्भधारणेसाठी तुमच्या गर्भशयाला आणि शरीराला तयार करण्याचा हा एक प्रकारे मार्ग असतो. त्यामुळेच नियमित आणि नैसर्गिक मासिक पाळी येणे हे निरोगी असण्याचे एक लक्षण मानले जाते.

मासिक पाळी च्या लांबी मध्ये एवढा फरक का ?

मासिक पाली किती दिवस असते याबद्दल आपण नेमके उत्तर आणि त्याबद्दल थोडा ऊहापोह वर केलेला आहे. पण तुमची मासिक पाळी मागे पुढे, कमी जास्त होत असेल तर त्या मागील कारणे आणि परिस्थिति समजून घेणे देखील महत्वाचे आहे. मासिक पाळी च्या लांबी मध्ये एवढा फरक का असतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तुम्हाला होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवू शकते.

यामागील खालील कारणे महत्वाची ठरतात.

१. PCOS, PCOD

जर तुम्हाला PCOD किंवा PCOS चा आजार असेल तर तुमची मासिक पाळी जास्त दिवस टिकू शकते. यामधे तुम्हाला जास्त दिवस स्त्राव होऊ शकतो. त्यामुळे ओव्हुलेशन उशिरा होत असेल तर मासिक पाळी ची लांबी देखील जास्त दिवस राहते.

वाचा- PCOD साठी आयुर्वेदिक उपचार

२. हायपरथायरॉईडीझम

हायपरथायरॉईडीझम मध्ये सुद्धा तुमची मासिक पाळी 38 दिवसांपेक्षा जास्त लांबू शकते. एवढे दिवस मासिक पाळी लांबणे हे नक्कीच स्वाभाविक नाही. त्यामुळे मासिक पाळी नैसर्गिक आणि नियमित हवी असेल तर तुम्हाला अगोदर हायपरथायरॉईडीझम चे उपचार घ्यावे लागतील. हायपरथायरॉईडीझम मध्ये काही वेळा तुमची मासिक पाळी चुकू सुद्धा शकते.

3. वय

तुम्हाला पहिल्यांदाच मासिक पाळी आली असेल तर अशा वेळी मासिक पाळी जास्त दिवस राहते. ही मासिक पाळी नियमित होण्यास 3 वर्ष लागू शकतात. जस जस वय वाढेल तशी तुमची मासिक पाळी ही नियमित 21 ते 35 दिवसांची होते. पुढे तुम्ही चाळीशीत किंव पन्नाशीत असताना तुमची मासिक पाळी कमी कमी होते जाते. अगदी महिन्यातून 2 वेळेस किंवा 15 दिवसाला मासिक पाळी येऊ शकते.

४. मानसिक स्थिति

तुमचा तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक विकारांचा देखील तुमच्या मासिक पाळी वर परिणाम होत असतो. अनेक संशोधनात असे सिद्ध झाले आहे की तणावपूर्ण जीवनशैली, नोकऱ्या आणि जास्त तास काम करण्याऱ्या व्यक्तींमध्ये अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळी संबंधित इतर समस्यांचे प्रमाण अधिक आढळते.

५. लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे

संशोधनानुसार जास्त बीएमआय असलेल्या महिलांची मासिक पाळी जास्त दिवस चालते. हे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे. अतिरिक्त वाढलेले वजन आणि चरबी मुळे तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते. याचा परिणाम तुमच्या मासिक पाळी वर होतो. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात नसेल तर त्याचा तुमच्या मासिक पाळी वर देखील सरल सरळ परिणाम होईल.

६. मल्टीपॅरा

मल्टीपॅरा म्हणजे एक पेक्षा जास्त वेळा प्रसूती असणे. एक वेळ पेक्षा जास्त आपत्त्यांना जन्म देणाऱ्या महिलांची मासिक पाळी जास्त दिवस टिकते असे आढळून येते. याचे कारण सुद्धा प्रसूती अगोदर आणि प्रसूती पश्चात होणारे हार्मोनल असंतुलन आहे.

७. गर्भनिरोधक गोळ्या

जर तुम्ही नुकत्याच गर्भनिरोधक गोळ्या घेतलेल्या असतील आणि आता त्या बंद केल्या असतील तर यामुळे तुमची मासिक लांबू शकते किंवा काही दिवस अनियमित होऊ शकते. गर्भनिरोधक गोळ्या या कृत्रिम हॉरमोन असतात. त्यामूळे त्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळी वर होणे सहाजिक आहे. याचमुळे बंद केलेल्या गर्भनिरोधक गोळ्या मुळे अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास वेळ लागतो.

संबंधित वाचा- मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय.

८. धूम्रपान

संशोधनात असे सिद्ध झाले आहे की ज्या महिला धूम्रपान करतात, त्यांचे हॉर्मोन्स विस्कळीत होतात आणि त्यामुळे मासिक पाळी च्या समस्या सुरू होतात. विशेषकरून अशा महिलांमध्ये कामी मासिक पाळी असल्याचे आढळते. जसे की 15 दिवसाला मासिक पाळी किंवा महिन्यातून दोनदा मासिक पाळी.

९. कॅफिन

तुम्ही जर कॅफिन चे अधिक प्रमाणात सेवन करत असाल तर तुमची मासिक पाळी कमी होऊ शकते. चहा, कॉफी मध्ये असणारे कॅफिन हे तुमच्या मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोन्स चे संतुलन बिघडवतात. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होण्याचे प्रकार घडतात.

१०. अल्कोहोल

ज्या स्त्रिया अधिक मद्यपान करतात, अशांमध्ये मासिक पाळी कमी असल्याचे दिसून येते. विशेषकरून अल्कोहोल मुळे तुमच्या ovulation वर अधिक परिणाम दिसून येतो. यामुळे अर्थातच तुमची मासिक पाळी देखील अनियमित होणार.

वरील सर्व मुद्दे सोडले तर इतर काही घटक सुद्धा तुमची मासिक पाळी किती असते यावर परिणाम करू शकतात. इतर घटक जसे की तुमची जीवनशैली, तुमचा आहार, व्यायाम, तणाव, नैराश्य यांचा सुद्धा तुमच्या मासिक पाळी किती दिवस राहणार आणि किती दिवसाने येणार यावर परिणाम होत असतो.

अजून एक गोष्ट तुम्हाला याबरोबर लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे हे सर्व घटक सर्वांच्या बाबतीत सारख्याच पद्धतीने काम करतील असेल नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हे घटक वेगवेगळ्या पद्धतीने काम करतील.

तुमची मासिक पाळी किती दिवस असते ?

प्रत्येक स्त्रियांची मासिक पाळी वेगवेगळी असते हे आपण बघितलेच. पण तुमच्यासाठी किती दिवस मासिक पाळी सामान्य आहे हे तुम्ही कसे ठरवणार. पुढे आपण तेच बघणार आहोत

बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी चे दिवस लक्षात राहत नाही. अशा वेळी तुमची मासिक पाळी उशिरा, लवकर आली, पाळी किती दिवस राहिली याची माहिती नसते. मासिक पाळी संबंधी सर्व माहिती तुम्ही तुमच्याकडे ठेवली तर तुम्हाला तुमची मासिक पाळी किती दिवस असते, याबद्दल अचूक अशी माहिती मिळेल.

कारण आपण बघितले प्रत्येकाच्या बाबतीत मासिक ची लंबी ही वेगवेगळी असते. त्यामुळे इतर स्त्रियांना एवढे दिवस पाळी येते, तेवढेच दिवस मला ही यायला हवी असा विचार बाळगून चुकीच्या दिशेने तुम्ही जाऊ नका. असे होऊ शकते की तुमच्यासाठी मासिक पाळी चे दिवस हे वेगळे असू शकतात. त्यामुळे स्वतःची मासिक पाळी किती दिवस असते याची अचूक माहिती स्वतःकडे असणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा वापर करू शकता.

मासिक पाळी कशी चालते ?

हे करून 3 महिन्यांमध्ये तुम्ही तुमची मासिक पाळी ट्रॅक करून तुमच्यासाठी किती दिवस आणि काय नॉर्मल याचा निष्कर्ष काढू शकता.

  • तुमची मासिक पाळी किती तारखेला आली आणि किती तारखेला संपली याची कॅलेंडर च्या मदतीने नोंद ठेवा.
  • तुमची पुढची मासिक पाळी किती दिवसाला येते याची नोंद ठेवा.
  • पाळी मध्ये स्त्राव किती जास्त आणि कमी होतो याची माहिती ठेवा.
  • पाळी दरम्यान रक्ताच्या गुठळ्या पडतात की नाही.
  • तुमच्या पाळी दरम्यान होणारी spotting स्पॉटिंग याबद्दल माहिती असू द्या.

या सर्व गोष्टींची 3, 4 महीने तुम्ही सलग नोंद ठेवली तर तुमच्यासाठी मासिक पाळी किती दिवस असते आणि तेवढे दिवस येते आहे की नाही याबद्दल एक स्पष्ट कल्पना येईल.

डॉक्टरांना कधी दाखवावे ?

तुमची मासिक पाळी किती दिवस असते हे समजल्यावर तुम्हाला तुमच्या मासिक पाळी च्या लांबी विषयी साधारण कल्पना येऊन जाईल. त्यामुळे अशा वेळी घाबरण्याचे काही आवश्यकता नाही. पण कोणत्या परिस्थिति मध्ये घाबरण्याचे किंवा चिंता करण्याची आवश्यकता आहे हे समजणे तेवढेच आवश्यक आहे. खालील परिस्थिति मध्ये तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

  • 21 दिवसांपेक्षा कमी किंवा 35 दिवसांपेक्षा जास्त अंतराने मासिक पाळी येणे.
  • तीन महिने (किंवा 90 दिवस) मासिक पाळी नाही आली.
  • मासिक पाळीचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त किंवा हलका असतो.
  • सात दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव टिकतो.
  • रक्तस्त्राव असताना तीव्र वेदना, क्रॅम्पिंग, मळमळ किंवा उलट्या होणे .
  • मासिक पाळीच्या दरम्यान होणारे अतिरिक्त रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग.

वरील सर्व किंवा कोणती ही गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.

आतापर्यंत आपण मासिक पाळी किती दिवास असते याबद्दल आणि यासंबंधित इतर जी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, ती सर्व माहिती तुम्हाला समजली असेल.

शेवट

शेवटी, हे ओळखणे आवश्यक आहे की मासिक पाळीचा कालावधी अनेक घटकांमुळे व्यक्तींमध्ये बदलू शकतो. काहींना कमी किंवा जास्त कालावधीचा अनुभव येऊ शकतो, परंतु मासिक पाळीच्या लांबीमधील वैयक्तिक फरक (विशिष्ट मर्यादेत) सामान्य मानला पाहिजे.

याच बरोबर हे ही लक्षात घेणे तेवढेच महत्वाचे आहे की मासिक पाळी बाबत सतत असणारी अनियमितता याबद्दल तुम्ही जागरूक असायला हवे. म्हणजे सतत आणि दर महिन्याला उशिरा येणारी मासिक पाळी, जास्त काळ टिकणारा रक्तस्त्राव, सतत पाळी चुकणे या गोष्टीबद्दल योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक आहे.

तरी तुमच्या मासिक पाळी विषयी इतर काही समस्या असतील आणि ब्लॉग बद्दल काही सूचना असतील, ब्लॉग कसा वाटला याबद्दल कमेन्ट वर कळवू शकता. धन्यवाद.

FAQ’s

मासिक पाळी किती वर्षानंतर जाते ?

साधारणपणे ४० ते ५० वर्षांनंतर तुमची मासिक थांबते किंवा थांबायला सुरुवात होते.

एका तासाच्या औषधाने मला मासिक पाळी त्वरित कशी मिळेल ?

शास्त्रीय दृष्ट्या एका तासात किंवा कोणत्याही औषधाने एवढ्या त्वरित मासिक पाळी येणे शक्य नाही.

व्यायामाचा मासिक पाळीवर कसा परिणाम होतो?

व्यायामाचा मासिक पाळी वर परिणाम दिसून येतो. विशेषकरून शारीरिक दृष्ट्या अति कार्यशील असणाऱ्या महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळी चुकणे यासारखी लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

मासिक पाळीच्या किती दिवसांनी तुम्ही ओव्हुलेशन करता ?

साधारणपणे मासिक पाळी मध्ये १४ व्या दिवशी ओव्हुलेशन ची प्रक्रिया होते. काही महिलांमध्ये याबाबतीत २, ३ दिवसांचा फरक आढळू शकतो.

महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे सामान्य आहे का ?

महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे हे अनैसर्गिक आहे. तुमच्या मासिक पाळी मध्ये २१ ते ३५ दिवसांचे अंतर असणे स्वाभाविक आहे. पण एवढ्या दिवसांचा फरक असेल तर याविषयी तुम्हाला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment