कोरफड वनस्पती अनेक वर्षांपासून तिच्या अनेक फायद्यांसाठी वापरली जाते. तसेच कोरफड खाण्याचे फायदे देखील अनेक आहेत.
कुठेही, कोणत्याही भागात सहज उपलब्ध होणारी ही वनस्पती तिच्या आरोग्य विषयक फायद्यांसाठी अनेक स्वरुपात वापरली जाते. यामध्ये कोरफड चे ज्यूस, काढा, फेसवॉश, साबण आणि इतर बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून कोरफड चा वापर केला जातो.
पण तुम्हाला माहीत का की कोरफड खाल्ली पण जाते आणि कोरफड खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत.
The British journal of general practice: the journal of the Royal College of General Practitioners या मध्ये प्रकाशित या संशोधनात कोरफड खाण्याच्या स्वरुपात सेवन केली तर त्याचे देखील फायदे मिळतात असे सांगितलेले आहे.
त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला आहे की “कोरफड चे तोंडी प्राशन केल्यामुळे रक्तातील ग्लुकोज (Blood Sugar Level) आणि रक्तातील लिपिड (Lipids) म्हणजेच फॅट ची पातळी कमी होण्यासाठी मदत होते. तसेच जननेंद्रिय भागात झालेला नागीण आणि सोरायसिस या आजारात ही प्रभावी ठरू शकते.”
यावरून असे समजूया किंवा हे फॅक्टस आहेत की आता आधुनिक वैद्यक शास्त्रात सुद्धा कोरफड वनस्पति वर संशोधन करण्याच्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे. कारण आधुनिक वैद्यक शस्त्राने सुद्धा कोरफड चे आरोग्यदायी गुण मान्य केले आहे.
याच अनुषंगाने आपण कोरफड खाण्याचे फायदे कोणते आणि ते कसे याबद्दल माहिती बघणार आहोत.
दोन्ही उपचार शास्त्र म्हणजे आयुर्वेद आणि अल्लोपॅथी मध्ये कोरफड खाण्याचे फायदे सांगीतले आहे. या मुळे आपण आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धती म्हणजेच अल्लोपॅथी नुसार कोरफड खाण्याचे फायदे बघणार आहोत.
आयुर्वेद नुसार कोरफड खाण्याचे फायदे
१. पित्त (उष्णता)
कोरफड खाण्याचे फायदे यांचा विचार करत असताना आयुर्वेदात पित्त या दोषाचा विचार करणे गरजेचे ठरते.
आयुर्वेदनुसार उत्तम आणि नैसर्गिक आरोग्य ठेवायचे असेल तर शरीरात वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष समप्रमाणात आणि शुद्ध असायला हवे.
यामध्ये जर तुमचा पित्त दोष बिघडला तर अनेक आजार होऊ शकतात. यामध्ये त्वचविकार, अॅसिडिटी वगैरे बरेच आजार होण्याची शक्यता असते.
थोडक्यात काय तर पित्त दोष बिघडल्यास पित्त दोष संबंधी आजार होतात.
आता हा दूषित झालेला किंवा साधारण भाषेत बिघडलेला पित्त दोष शुद्ध करायचा आणि समप्रमाणात आणायचा असेल तर त्याच्या विरुद्ध गुण असणाऱ्या द्रव्यांचे सेवन करावे लागेल.
पित्ताचा गुण हा उष्ण असतो. तेव्हा वाढलेला पित्त दोष कमी करायचा असेल तर शीत गुण असणाऱ्या द्रव्यांचे सेवन करणे अपेक्षित आहे.
अशा परिस्थिति मध्ये आपण कोरफड चा उपयोग केला पाहिजे. कारण कोरफड वनस्पति शीत गुणांची असते.
पित्त दोष वाढल्यामुळे किंवा दूषित झाल्यामुळे जेवढे आजार होतात त्या आजारासाठी जर कोरफड चे सेवन केले तर आराम मिळेल.
आता हा पित्त दोष वाढल्यामुळे विशेष करून दोन प्रकारचे आजार किंवा समस्या होण्याची शक्यता असते. एक म्हणजे पचनसंबंधित आणि दुसरी म्हणजे त्वचा विकार.
याची थोडक्यात माहिती घेऊ.
पचन विकार
आयुर्वेद मध्ये जसे कोरफड ला महत्व आहे तसेच ‘अग्नि’ या संकल्पनेला सुद्धा महत्व आहे. अग्नि म्हणजे तुमच्या पचनसंस्थेची पचन संबंधी क्रिया पूर्ण करण्याची क्षमता.
म्हणजे आपण ऐकतो तुमचा अग्नि चांगला असेल तर तुम्हाला भूक चांगली लागते, अन्न लवकर पचते आणि ते योग्य वेळेवर बाहेर ही पडते. पण हाच अग्नि बिघडला तर तुमची पचनक्रिया बिघडते आणि तुम्हाला पचन संबंधित अनेक समस्या होतात.
इथे वाचा-पचनक्रिया कशामुळे बिघडते
अग्नि चे प्रकार देखील असतात. पण जठराग्नि हा महत्वाचा प्रकार. ज्यामुळे आपले अन्न पचन प्रक्रिया वगैरे संबंधित क्रिया पार पडत असतात.
पण जर पित्त दोष वाढला तर हा अग्नि देखील दूषित होतो. अग्नि दूषित झाल्यामुळे तुम्हाला पचन विकार जसे हायपर अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचन होत असते.
अशा वेळी कोरफड च्या थंड आणि शीत गुणांमुळे अॅसिडिटी वगैरे पचनसंबंधित समस्यांवर आराम मिळतो.
त्वचा विकार
कोरफड खाण्याचे फायदे हे बऱ्याच वेळेला आंतरिक जरी असले तरी बाह्य स्वरूपात देखील त्याचे अनेक फायदे आहेत. जसे की त्वचा विकारमध्ये.
पित्त दोष दोष दूषित झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे त्वचा विकार होण्याचे प्रमाण देखील वाढते. यामुळे अनेक प्रकारचे त्वचविकार होत असतात. सोरायसिस, नागीण, गजकर्ण सारखे आजार हे पित्त दोष वाढल्यामुळे होणारे त्वचविकार आहेत. यामुळे वरील संशोधनात देखील आधुनिक वैद्यक शास्त्राने यावर कोरफड हा पर्याय मान्य केलेला आहे.
कोरफड खाल्ल्याने किंवा त्याचा उपयोग बाह्य स्वरूपात केल्याने तेथील वाढलेला पित्त दोष कमी होण्यास मदत होते.
२. आमदोष (डिटॉक्सिफिकेशन)
आयुर्वेद मध्ये अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे आमदोष. आता आमदोष म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं झाल तर, आपण जे अन्न खातो, ते अन्न जर पचन न होऊन आमशयात (पोटात) जास्त वेळासाठी पडून राहिले तर त्याने विशिष्ट अपायकारक पदार्थ तयार होतो त्याला आमदोष म्हणतात.
आता हा आमदोष एक प्रकारचे शरीरात असणारे toxins आहेत. हे toxins शरीराबाहेर फेकणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोरफड चा उपयोग करतो.
थोडक्यात काय तर आमदोष कमी करण्यासाठी देखील कोरफड चा उपयोग केला जातो. आता आमदोष उत्पन्न झाला म्हणजे नेमके काय झाले. जेव्हा आमदोष तयार होतो तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. वरील सर्व प्रकारच्या समस्या जसे की अॅसिडिटी, जळजळ वगैरे इतर जे पित्त दोष वाढल्यामुळे होतात तेच आजार आमदोष वाढल्यामुळे देखील होतात.
३. दोषांचे साम्य
आयुर्वेद हे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर आधारित आहे. तुम्हाला कोणतीही आरोग्य विषयक समस्या झाली असेल तर त्यासाठी या तीन दोषांचाच विचार करून त्यावर उपचार आणि इतर गोष्टी ठरवल्या जातात.
हे तिन्ही दोष समप्रमाणात असणे आवश्यक आहे. म्हणजे यामधील कोणताही एक दोषाचे कमी अधिक प्रमाण झाले की आरोग्य समस्या उद्भवतात. यामुळे आपण सर्वांचे, तिन्ही दोष समप्रमाणात ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
कोरफड वनस्पति वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष समप्रमाणात ठेवण्याचे काम करते. जर पित्त वाढलेला असेल तर कमी करते, त्याचप्रमाणे कफ किंवा वात दोष वाढलेला असेल तर ते ही कमी करते.
आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार कोरफड खाण्याचे फायदे
कोरफड याला इंग्रजी मध्ये Aloe vera असे म्हणतात.
कोरफड खाण्याचे फायदे हे आधुनिक वैद्यकीय शास्त्रात देखील सांगितले आहे.
यानंतर आपण कोरफड खाण्याच्या फायद्याविषयी मॉडर्न वैद्यक शास्त्र काय सांगते ते बघूया.
१. मधुमेह
कोरफड खाल्ल्याने किंवा कोरफड चे ज्यूस पिल्यामुळे रक्तातील ग्लुकोस (glucose) ची पातळी नियंत्रणात राहते. रक्तातील ग्लुकोस लेवल जर नियंत्रणात राहत असेल तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी याचा फायदा होतो.
कोरफड रक्तातील ग्लुकोसची पातळी नियंत्रणात ठेवते यावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन चालू आहे. तरी आतापर्यंत काही गोष्टी सिद्ध झालेल्या असून त्यामुळे वैज्ञानिकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. ते कोणते आहेत ते बघूया.
- कोरफड मध्ये काही पॉलिसेकेराइड्स (polysaccharides) आढळून आले आहेत. यामध्ये ग्लुकोमनन (glucomannan) आणि एसेमनन(acemannan) नावाचे पॉलिसेकेराइड्स रक्तातील ग्लुकोस चे नियंत्रण करते. तसेच या दोन घटकांमुळे ग्लुकोस चा वापर आणि इंसुलिन सेनसीटीविटी (sensitivity) सुधारते.
- कोरफड मध्ये काही anti-inflammatory कंपाऊंड असतात ज्यामुळे शरीरात होणारे inflammation कमी होत राहते. Inflammation मुळे रक्तातील ग्लुकोस चे प्रमाणचे आणि इंसुलिन सेनसीटीविटी बिघडू शकते.
- कोरफड मध्ये अँटिऑक्सिडंट असतात. तसेच विटामीन ए आणि ई देखील असते ज्यामुळे शरीरात ऑक्सिडेशन (oxidation) प्रोसेस होत राहते. अधिक ऑक्सिडेशन मुळे मधुमेह होण्याचे प्रमाण कमी होत जाते.
- कोरफड मुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ट्रायग्लिसेराइड्स (Triglycerides) आणि कमी घनतेचे लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (LDL) यांचे प्रमाण कमी होते. यामुळे परिणामी इनसुलीनं सेनसीटीविटी सुधारते.
बायोलॉजिकल अँड फार्मास्युटिकल बुलेटिन नुसार कोरफड आणि त्यापासून मिळणारे फायटोस्टेरॉल हे घटक रक्ताची ग्लुकोस ची पातळी कमी करण्यात उपयोगी ठरते ज्यामुळे याचा उपयोग टाइप २ डायबेटीस मध्ये करता येतो
या संशोधन लेखात रक्तातील ग्लुकोस लेवल आणि कोरफड संबंध काय याची माहिती दिलेली आहे.
या आणि अशा अनेक अभ्यासातून सिद्ध आहे झाले आहे की फोरफड सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोस पातळी नियंत्रणात राहते.
२. वजन नियंत्रण
आयुर्वेद तसेच मॉडर्न सायन्स नुसार कोरफड खाण्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी सुद्धा होतात.
कोरफड मुळे प्रत्यक्षरीत्या वजन कमी होत नाही. पण कोरफड चा उपयोग केल्याने अन्य जे फायदे मिळतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
इथे वाचा- आयुर्वेदनुसार वजन कसे कमी करावे
याबद्दल काही फॅक्टस समजून घेतले तर कोरफड आणि वजन नियंत्रण यांचा संबंध लक्षात येईल.
- कोरफड मध्ये ऍन्थ्रॅक्विनोन (Anthraquinone) नावाचे एक घटक असते. हे रेचक म्हणून काम करते. रेचक म्हणजे मल बाहेर काढण्याची प्रक्रिया. यासाठी हे घटक उपयोगी येते. यामुळे जठर यांची हालचाल होऊन पोटात साचलेले अन्न लवकर बाहेर पडते. ज्यामुळे चरबी तयार होण्याचे काम थांबते.
- आपण बघितले आहे की कोरफड आमदोष बाहेर काढतो म्हणजेच शरीर डिटॉक्स करते. यामुळे सर्व बाहेर पडतात. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. परिणामी अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
- आपण बघितले की कोरफड रक्तातील साखरेचे नियंत्रण करते. यामुळे जास्त साखर उपयोगी होऊन त्यापासून भूक निर्माण होणे थांबते. कारण कोरफड रक्तातील साखरेचे कमी जास्त गरजेनुसार नियंत्रण करत असते. यामुळे overeating टळून वजन नियंत्रण करण्याचे काम होते.
- यावर अजून शिक्कामोर्तब नाही पण अनेक शास्त्रज्ञ मंडळीचे म्हणणे आहे की कोरफड मुळे शरीरातील metabolism ची प्रक्रिया वाढते. Metabolism म्हणजे शरीराची चयापचय क्रिया ज्यामध्ये अधिक प्रमाणात calories खर्ची पडतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
अशा पद्धतीने कोरफड सेवन केल्यामुळे वजन नियंत्रण सुद्धा साध्य होऊ शकते.
३. त्वचा
बहुतेक जणांना कोरफड ही त्वचेसाठी आणि त्वचेवर कोणत्याही विकारांवर किती फायदेशीर आहे हे माहीत असेलच. आपण आजकाल ब्रॅंडस आणि त्यांच्या जाहिराती बघतो, त्यामुळे याबद्दल सर्वांना माहिती असावीच.
पण कोरफड चे हे फायदे आपल्याला कसे मिळतात वगैरे याची मूलभूत शास्त्रीय माहिती आपल्याकडे नसते ती माहीती देखील थोडी जाणून घेऊया.
- कोरफड मध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असल्यामुळे त्याचा त्वचेसाठी चांगला उपयोग होतो. सेवन केल्यास त्वचेला आतमधून हायड्रेट (hydrate) करते आणि त्वचेच्या कोरडेपणापासून मुक्त करते. परिणामी त्वचेची लवचीकता सुद्धा वाढते.
- कोरफडीमध्ये जे पॉलिसेकेराइड्स आणि ग्लायकोप्रोटीन्स असतात ते तुम्हाला सूर्यापासून त्वचेला जे नुकसान होते ज्याला आपण sunburn म्हणतो त्यापासून वाचवतात.
- व्हिटॅमिन C, E आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे कोरफड अकाली येणारे वृद्धत्व म्हणजेच ageing कमी करण्यास मदत करते. कोरफड चे रोज सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील रेषा जाऊन त्वचा तरुण दिसते.
- Anti-inflammatory गुणधर्म असल्यामुळे कोरफड चेहऱ्यावरील सूज, लालसरपणा, जळजळ कमी करते. तसेच अनेक त्वचविकरांवर देखील याचा उपयोग होतो जसे की सोरेसिस, गजकर्ण, नगिन.
४. केसांचे आरोग्य
त्वचेबरोबर केसांच्या अनेक समस्येवर सुद्धा कोरफड चे सेवन केल्यामुळे फायदा होतो. आपण बघतो की अनेक केसांवर वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांवर कोरफड चा उपयोग केला जातो.
- केसांच्या वाढीसाठी केसांच्या मुळांचे आरोग्य चांगले आणि टाळूचे Ph वॅल्यू यांचे बॅलेन्स राखणे महत्वाचे असते. कोरफड मधील enzymes मुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात म्हणून कोरफड केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.
- कोरफड मध्ये antimicrobial गुणधर्म असल्यामुळे केसांचा कोंडा कमी करण्यास देखील मदत होते. यामुळे डोक्यावर येणारी रुक्षता आणि खाज कमी होते.
- केस मजबूत करण्यासाठी देखील कोरफड चे सेवन करता येते. कोरफड मध्ये केसांसाठी आवश्यक सर्व पोषक घटक असल्यामुळे केसांना पूर्णपणे पोषण भेटते आणि केस मजबूत राहतात.
- कंडिशनर म्हणून देखील कोरफड चा उपयोग होतो. आपण बघितले की कोरफड मुळे hydration होते ज्यामुळे केसांना व्यवस्थित आणि आवश्यक तेवढे moisturization भेटते.
अशा सर्व आरोग्य समस्येवर कोरफड सेवन केल्याने तुम्ही फायदे मिळवू शकता.
या सर्व माहितीमधून आपल्याला कळले असेल की पचन समस्यापासून ते त्वचेच्या समस्या पर्यन्त अशा वैविध्यपूर्ण आरोग्य फायद्याचा लाभ या कोरफड पासून घेऊ शकता.
तेव्हा दैनंदिन वापरा मध्ये कुठेही सहज मिळणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पति चा समावेश नक्की करा.
मी दिलेली माहिती आवडली असेल, ती तुम्हाला उपयोगी ठरली असेल तर कमेन्ट द्वारे कळवू शकता. तसेच तुमचा अभिप्राय, मत आणि सल्ला असेल तर तो ही कळवा. धन्यवाद.
FAQ’s
कोरफड कशी खावी?
कोरफड खाण्यासाठी कोरफड च्या पानामधून त्याचा गर म्हणेच जेल काढून ते तुम्ही ज्यूस किंवा सॅलड मध्ये टाकून त्याचे सेवन करा. लक्षात असू द्या की कोरफड ची वरची त्वचा पूर्णपणे काढून घ्यायची आहे.
चेहऱ्याला कोरफड कशी लावायची?
चेहऱ्याला कोरफड लावण्यासाठी चेहरा स्वच्छ धुवून त्यावर कोरफड चे जेल काढून त्याचा थर चेहऱ्यावर लावावा. १० ते १५ मिनीटे तसेच ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
केसांना कोरफड कशी लावायची?
केसांना कोरफड लावण्यासाठी चेहऱ्या प्रमाणेच केसांना देखील आधी धुवा. ओल्या केसांना कोरफड जेल लावून १० ते १५ मिनीटे तसेच राहू द्या. त्यानंतर केसांना पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
कोरफड खाण्याचे नुकसान आहे का?
नाही. कोरफड खाण्याचे काही नुकसान नाही. पण कोरफड च्या त्वचेच्या खालचा थर खाण्यात आला तर मात्र पोटात समस्या होऊ शकतात जसे की उलट्या,अतिसार आणि इतर संबंधित तक्रारी.
कोरफड चे तोटे काय आहेत?
सामान्यपणे कोरफड सेवन केल्यामुळे किंवा त्याचा बाह्य उपयोग केल्याने कोणताही अपाय होत नाही. पण काही व्यक्तींना कोरफड ची एलर्जि किंवा त्वचेवर जळजळ होऊ शकते. पण याचे प्रमाण खूप कमी आहे.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747