डोकेदुखीवर घरगुती उपाय – १० मिनिटांत मिळेल आराम

डोकेदुखी… एक असा त्रास जो अनेकांना अगदी आठवड्यातून दोन-तीनदा किंवा एकदा तरी भेडसावतोच. काहींना हा त्रास थकव्यामुळे होतो, काहींना झोपेच्या कमतरतेमुळे, तर काहींना स्ट्रेसचा परिणाम म्हणून! कारणे तशी अनेक आहेत.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डोकेदुखी वर घरगुती उपाय करून तुम्ही कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय इन्स्टंट आराम मिळवू शकता ?

कारण डोकेदुखीचा सामना करताना अनेकजण पेनकिलरकडे वळतात, पण यामुळे होणारे दीर्घकालीन परिणाम तुम्ही टाळू शकता का ?

अजिबात नाही !

एका रिसर्च नुसार जवळपास ५० ते ७५ भारतीयांना नियमित डोकेदुखीचा सामना करावा लागतो. यातील ५०% लोक पेनकिलर औषध घेतल्यामुळे इतर आजारांनी त्रस्त आहेत.

त्यामुळे तुम्हाला वाटत नाही का की डोकेदुखी सारख्या समस्यांवर प्रथम आपण काही नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करून बघावेत ?

कारण ८० टक्के होणाऱ्या डोकेदुखी यांची कारणे वैद्यकीय नसून सामान्य म्हणजे functional आहेत जसे की मानसिक तणाव ,थकवा, मोबाइल किंवा स्क्रीन असणाऱ्या उपकरणे वापरणे वगैरे.

तर आजच्या माझ्या या ब्लॉग चा विषय याच एका विचारावर आधारित असणार आहे. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तुम्हाला डोकेदुखीवर घरगुती उपाय ते ही सोप्या आणि प्रभावी उपायांची सखोल माहिती देणार आहे.

तर, तुम्ही तयार आहात का डोकेदुखीला कायमचा निरोप देण्यासाठी?

चला, घरगुती उपायांच्या या प्रवासाला सुरुवात करूया !

डोकेदुखी चे प्रकार

डोके कोणत्या वेळेला दुखते आणि प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी दुखते यावरून डोकेदुखी चे प्रकार ठरत असतात. हे डोकेदुखी चे प्रकार सांगण्याचा उद्देश म्हणजे हा की ज्या प्रकारची डोकेदुखी असेल तर त्यानुसार त्यांचे गांभीर्य आणि त्यावर उपचार ठरवले जातात. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात डोकेदुखीचे प्रकार माहीत असणे आवश्यक आहे.

१. टेंशन टाइप डोकेदुखी

या डोकेदुखी ला थोडक्यात TTH असे म्हणतात. याचा अर्थ tension type headache असा होतो. याच्या नावाप्रमाणेच याची कारणे देखील आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या टेंशन मुळे ही डोके दुखी होते. उदाहरणार्थ,

  • भावनिक तणाव.
  • डोळ्यावरील ताण.
  • दारू.
  • दातांच्या समस्या (जसे की तुमचा जबडा घासणे आणि दात घासणे).
  • कोरडे डोळे.
  • थकवा.
  • धूम्रपान.
  • सर्दी किंवा फ्लू.
  • सायनस संसर्ग.
  • कॅफिन.
  • पुरेसे पाणी न पिणे.
  • पुरेशी झोप न घेणे.

या सर्व कारणांमुळे या प्रकारची डोकेदुखी होऊ शकते. रिसर्च नुसार सर्वाधिक जास्त प्रमाणात आणि सामान्यपणे आढळणारा हा डोकेदुखी चा प्रकार आहे. 2018 च्या आर्टिकल नुसार जगातील जवळपास ४० टक्के या डोकेदुखी मुळे त्रस्त आहेत.

या मध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूला तसंच कवटीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला होऊ शकते.

२. क्लस्टर डोकेदुखी

या प्रकारची डोकेदुखी खूप क्वचित लोकांमध्ये आढळते. रिसर्च नुसार कोणत्या लोकसंखेच्या फक्त १ टक्के लोकांना या प्रकारच्या डोकेदुखी चा त्रास होतो. पण या डोकेदुखी मध्ये खूप तीव्र वेदना होत असतात.

या क्लस्टर डोकेदुखी चे काही वैशिष्ठ्य बघूयात.

  • खूप तीव्र डोकेदुखी च्या वेदना होतात
  • या डोकेदुखी चे एक चक्र असते. म्हणजे एखाद दिवस पूर्ण दिवसभर राहते आणि दुसऱ्या दिवशी गायब होते.
  • महिलांपेक्षा पुरुषांना या डोकेदुखी चा त्रास अधिक जाणवतो.
  • तसेच डोकेदुखी चा हा प्रकार विशेषकरून किशोरावस्था आणि तरुणावस्था मध्ये जास्त आढळतो.

क्लस्टर डोकेदुखी एक गंभीर डोकेदुखी चा प्रकार आहे. गंभीर असून ही यावर काही उपचार मदत करू शकतात पण कायमचा उपचार यावर अजून उपलब्ध नाही.

३. मायग्रेन डोकेदुखी

मायग्रेन डोकेदुखी ला अर्ध डोकेदुखी सुद्धा म्हणतात. कारण नावाप्रमाणे यामध्ये डोक्याची एकच बाजू दुखत असते आणि वेदना देखील तीव्र असतात.

या व्यतिरिक्त प्रामुख्याने इतर लक्षणे यामध्ये जाणवतात ते,

  • मळमळ
  • उलट्या
  • प्रकाश संवेदनशीलता (प्रकाश, लाइट सहन होत नाही)
  • आवाज संवेदनशीलता (आवाज सहन होत नाही)

विशेष म्हणजे ही डोकेदुखी महिलांमध्ये जास्त आढळते. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन नुसार जगातील १० टक्के लोकांना या डोकेदुखीचा त्रास होतो

४. इतर प्रकार

वरील मी जे तीन प्रकारचे डोकेदुखी चे प्रकार सांगितले आहेत ते महत्वाचे आणि प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त,

  • औषधांच्या अतिवापरा मुळे होणारी डोकेदुखी. याला Medication-overuse headache असे म्हणतात.
  • अतिव्याममुळे होणारी डोकेदुखी. याला Exercise headache म्हणतात.
  • गर्भधारणा मध्ये होणारी डोकेदुखी. याला pregnancy headache म्हणतात.

हे सर्व डोकेदुखी चे प्रकार जरी आपण बघितले असले जेव्हा सामान्य डोकेदुखी असते अशा वेळी आपण काही घरगुती उपाय करून ती डोकेदुखी दूर केली पाहिजे.

चला तर मग, डोकेदुखी वर काही प्रभावी असे घरगुती उपाय बघूयात.

‘हे’ डोकेदुखी वर घरगुती उपाय ठरणार तुम्हाला फायदेशीर

१. पाणी पिणे

अत्यंत सोपा असा हा घरगुती उपाय आहे. डोकेदुखी साठी घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर हा नक्की करून बघा. मी जेव्हा लोकांना हा उपाय सांगत असतो बऱ्याच जणांना हा पटत नाही. म्हणतात पाणी आणि डोके दुखण्याचा काय संबंध आहे. संबंध आहे मित्रांनो.

डोकेदुखी आणि शरीरात पाणी या दोन घटकांचा परस्पर संबंध जाणून घ्यायचा असेल तर यामागचे विज्ञान जाणून घेणे महत्वाचे आहे.

पहिले कारण समजून घेऊया.

  • आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपल्या शरीरात आवश्यक त्या प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. पण असे का. जसे आपल्याला काम करण्यासाठी किंवा आरोग्यदायी राहण्यासाठी पाणी आवश्यक असते तसेच शरीरामधील अवयवांना देखील तेच लागू आहे. शरीरातील प्रत्येक अवयव चांगल्या रीतीने त्याचे कार्य करून आपले एकंदर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक पद्धतीने पाण्याचा वापर करत असतात.

मेंदू हा देखील एक अवयव आहे. शरीरात मुबलक प्रमाणात पाणी नसेल तर डिहायड्रेशन ची स्थिति निर्माण होते. पाणी नसल्या कारणाने मेंदुमधील देखील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामधे मेंदूला पाण्याच्या माध्यमातून मिळणारे पोषक घटक मिळू शकत नाही. परिणामी मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाही.

यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे वगैरे या सारख्या समस्या आपल्याला जाणवू शकतात.

  • दुसरे कारण असे आहे की डिहायड्रेशन झाल्यामुळे मेंदूला पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नाही. मेंदुमध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. मेंदू आकुंचन पावत असताना काहीसा भाग मेंदूच्या कवटीपासून दूर होतो. अशा वेळेला मेंदूच्या सभोवताली असणारे बाह्य आवरणा च्या ठिकाणी असणाऱ्या मेंदूच्या काही भागांना धक्का बसतो. हा मेंदूचा भाग शरीरात वेदना निर्माण करत असतो.
डोकेदुखीवर घरगुती उपाय

थोडक्यात सांगायचे म्हणजे मेंदूचे pain receptors ट्रिगर झाल्यामुळे डोकेदुखी चा प्रॉब्लेम होतो. याच संबंधी अभ्यास European Journal of Neurology मध्ये २००५ साली प्रकाशित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ खाली दिलेला आहे.

वरील संशोधना नुसार, “दैनंदिन पाणी पिण्याचे प्रमाण १.५ लीटर ने वाढवले तर २ आठवड्यामद्धे २१ तास तुमचे डोकेदुखी होण्याचा त्रास कमी होईल.” थोडक्यात सांगायचे म्हणजे मेंदूचे pain receptors ट्रिगर झाल्यामुळे डोकेदुखी चा प्रॉब्लेम होतो.

तसेच जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूरोसायन्स नुसार पाणी पिणे हा डोकेदुखी कमी करण्यासाठी किंवा डोकेदुखी रोखण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे.

म्हणून डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हणून दोररोज, दिवसभरात पुरेसे पाणी पिताय न याची खात्री करा. माझे कधी अचानक डोके दुखले तर मला माहीत होते की मी आज पुरेसे पाणीच पिलेले नाही.अ शा पद्धतीने तुमच्या डोकेदुखी साठी देखील कमी पानी पिणे हे कारण असू शकते.

त्यामुळे डोके दुखत असेल तर लगेच एक ग्लास पाणी घेऊन ते प्यावे. तसेच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित रहा. या व्यतिरिक्त रसाळ फळे ज्यामध्ये रस म्हणजेच पाण्याचे प्रमाण अधिक असते अशा फळांचे सेवन करा.

२. एक्यूप्रेशर

एक्यूप्रेशर ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे. एक पारंपरिक, चीन या देशामध्ये प्रख्यात अशी ही उपचार पद्धती आहे. यामधे तुमच्या वेदना शरीरातील विशिष्ठ बिंदुनवर दबाव देऊन कमी केल्या जातात. असो. आपल्याला त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची गरज नाही.

या पद्धतीचा विचार आपण फक्त डोकेदुखी या अनुषंगानेच करणार आहोत.

डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हणून तुम्ही एक्यूप्रेशर चा उपयोग करू शकता. खूप कठीण किंवा अवघड यामधे काही नाही.

  • तुम्हाला फक्त तुमच्या डोक्याच्या समोरच्या भागाला म्हणजेच कपाळाला तुमच्या हाताच्या दोन बोटांनी गोलाकार पद्धतीने मालीश करायची आहे. मालीश केल्यानंतर त्याच बोटांच्या समोरच्या भागांनी म्हणजेच बोटाच्या टोकांनी काही बिंदुनवर दबाव द्यायचा आहे. आता तो दबाव कुठे द्यायचा ते पुढे बघूया.
  • हा दबाव तुम्ही दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी आणि भुवयांच्या वरच्या भागावर द्यायचा आहे. लक्षात असू द्या की हा दबाव हळुवार आणि सावकाशपणे द्यायचा आहे.

या मागील विज्ञान असे आहे की आपल्या शरीरात काही नैसर्गिक वेदनाशमक द्रव किंवा हॉर्मोन्स असतात. त्यापैकीच एक म्हणजे एंडोरफीन (endorphin) हॉरमोन. डोक्याच्या या विशिष्ठ बिंदुवर दाब दिल्यास एंडोरफीन हॉरमोन सीक्रेट होतात.

हे एंडोरफीन हॉर्मोन्स डोकेदुखी कमी करण्यासाठी मदत करतात.

त्यामुळे डोके दुखत असल्यास अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यावर डोकेदुखीवर तत्काळ फरक पडतो.

३. योगा, ध्यान

कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असो, योगा आणि ध्यान केल्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. डोकेदुखी वर घरगुती उपाय मध्ये सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे हाच.

आपल्याला आजकाल खूप खराब सवय लागली ती म्हणजे डोक दुखले की जा मेडिकल वर आणि घ्या गोळी. यासाठी पैसे खर्च करायला तयार आहात पण शरीराच्या हालचाली करायला तयार नाही. जेव्हा की या हालचाली दीर्घ आयुष्यासाठी देखील फायदेशीर आहे.

करून बघितल्याने नक्कीच फरक पडतो. मी तर म्हणतो योग कशाला, तुम्ही फक्त ज्या अवस्थेत तुमचे डोके दुखते ती अवस्था, जागा बदला, थोडे फिरायला लागा, चाला, मानेचा व्यायाम करा, हातपाय फिरवा. एवढे ही केले तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला डोकेदुखीवर बदल झालेला दिसेल.

पण या मध्ये काही विशिष्ठ योगासने बघूयात.

डोके दुखीवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही काही योगासने देखील करू शकता.

  • यामधे पद्मासन, अर्ध मत्स्येंद्रासन, उत्तनसणा, सेतु बंदसना, विपरीत करणी हे आसन डोकेदुखी झाल्यावर केल्यास आराम मिळतो.

या सर्व आसनांमुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो, शरीरातील सर्व अवयवांना आराम मिळतो. त्यामुळे सर्व शरीरात रक्तपुरावठा सुधारतो. यामुळे मेंदू मध्ये रक्तपुरवठा चांगला होऊन डोकेदुखी देखील थांबते.

तसेच मेडिटेशन करून देखील डोकेदुखी पासून आराम मिळतो.

जर तुमचा सेल्फ हीलिंग वर विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीवर देखील विश्वास असायला हवा की मेडिटेशन ने डोकेदुखी थांबते.फक्त डोकेदुखीच नाहीतर इतर अनेक आजार हे सेल्फ हेंलिंग ने बरे होऊ शकतात.

यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे मेडिटेशन करू शकता. यामधे तुम्ही ॐ चा उच्चार काही वेळेसाठी केला तरी देखील तुमची डोकेदुखी थांबते. करून बघा आणि स्वतः अनुभवा.

४. कॉफी

सर्वांना माहीत असणारा आणि सर्वांच्या आवडता असा हा घरगुती उपाय. डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हटले की सर्वात आधी आपल्याला कॉफी किंवा चहा आठवणार आणि ते खरे ही आहे.

कॉफी मध्ये caffeine नावाचे आहे घटक असते जे तुमच्या मेंदूच्या हालचाली वाढवते. यामुळे मेंदूला एक प्रकारे ताजेतवाने असल्याची भावना निर्माण होते. पण हीच कॉफी डोकेदुखी साठी कारण ही ठरत असते.

एखादी व्यक्ति जेव्हा सातत्याने कॉफी घ्यायला लागते तेव्हा त्याच्या शरीराला आणि मेंदूला त्याची सवय झालेली असते. नंतर त्या व्यक्तीने कॉफी घेण्याचे टाळले तर मात्र त्याला डोकेदुखी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण शरीराला आणि मेंदूला आता त्या कॉफी ची सवय झालेली असते.

कॉफी अजून एक दुष्परिणाम घेऊन येते ते म्हणजे नैराश्य किंवा अति चंचलपणा. कॉफी मुळे cortisol आणि adrenaline हॉर्मोन्स रीलीज होत असतात. या हॉर्मोन्स मुळे तुम्हाला स्ट्रेस आल्यासारखी भावना येते आणि ह्रदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे डोकेदुखी वर घरगुती उपाय किंवा घरगुती उपचार म्हणून कॉफी वापरायची असेल तर संबंधित गोष्टींचा विचार करून वापरा.

५. अद्रक

अद्रक हा प्रभावी डोकेदुखी वर घरगुती उपाय आहे जो बहुतेक जण वापरतात. काही लोक याला गरम पाण्यामध्ये चहा पत्ती टाकून वापरतात. काही जण ही अद्रक कुटून बारीक करून चहा मध्ये टाकून पितात. हे सर्वांच्याच घरी खूप सामान्य असे चित्र आहे. डोकेदुखी सुरू झाली की आपण घरी अद्रक टाकून चहा करायला सांगतो.

डोकेदुखीवर घरगुती उपाय म्हणून अद्रक वापरण्याचे दोन कारण आहे.

एक म्हणजे अद्रक ही नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते ते.

दुसरे म्हणजे या अद्रक मध्ये gingerol नावाचे एक कंपाऊंड असते ते pain receptors पर्यन्त पोचणाऱ्या वेदनांचे सिग्नलस थांबवतात.

६. डोकेदुखी वर उपाय- स्वागत तोडकर

स्वागत तोडकर यांना महाराष्ट्रातील अनेक व्यक्ति ओळखतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसारगोपचार तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. अनेक असाध्य आजारांवर त्यांचे घरगुती उपाय तसेच आयुर्वेदिक उपचार प्रभावी आहेत. त्यांच्याबद्दलचा एक ब्लॉग आहे माझा तो बघू शकतो.

हे देखील बघा –स्वागत तोंडकार यांचे घरगुती आयुर्वेदिक उपचार.

त्यांनीच सांगितलेला डोकेदुखी वर घरगुती उपचार मी सांगत आहे. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता.

  • यासाठी तुम्हाला एक एरंडाचे पान आणि खोबरेल तेल घ्यायचे आहे (ताजे घाण्यावरचे तेल वापरायचे आहे,refined तेल नाही).
  • खोबरेल तेल घेऊन एरंड पानावर ते लावायचे आहे.
  • त्यानंतर त्या पानाला थोडे गरम करायचे आहे.
  • गरम केल्यावर डोक्याच्या माथ्यावर रात्री झोपताना ते पान बांधून झोपायचे आहे.

सारांश

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी तिच्यावर योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे. डोकेदुखीचे प्रकार समजून घेऊन त्यानुसार योग्य घरगुती उपायांचा अवलंब केला तर तुमची समस्या नक्कीच कमी होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण या ब्लॉग मध्ये आपण डोकेदुखीच्या काही सामान्य प्रकारांचे वर्णन केले आहे, जसे की टेंशन टाइप डोकेदुखी, क्लस्टर डोकेदुखी आणि मायग्रेन डोकेदुखी.तसंच त्यावर त्यावर काही घरगुती उपायांसारख्या सोप्या आणि सहज उपलब्ध पद्धतींवर भर दिला.

पुरेसे पाणी पिणे, एक्यूप्रेशर, योगा आणि ध्यान यासारख्या नैसर्गिक पद्धती, तसंच कॉफी, अद्रक आणि स्वागत तोडकर यांसारख्या घरगुती उपचारांमुळे डोकेदुखीपासून नक्कीच आराम मिळू शकतो. या उपायांचा तुम्ही नियमित वापर केला तर डोकेदुखीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

तसंच अधिक माहितीसाठी किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी तुम्ही मला संपर्क करून माझ्या ऑनलाइन कन्सल्टेशन सुविधेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s

डोकेदुखी का होते ?

मुख्य डोकेदुखीचे कारण आहे मेंदुमधील रक्तवाहिन्या एक तर संकुचित होणे किंवा expand होणे. ज्या ज्या कारणांमुळे हे घडते त्यामुळे डोकेदुखी होते. उदाहरण जास्त थंड किंवा तिखट खाणे पिणे,पुरेशी झोप न घेणे,हवामानात बदल,ताप किंवा असे तत्सम बरेच कारणे.

डोकेदुखीचे प्रकार कोणते आहेत ?

डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत असतात. सामान्य आढळणारे प्रकार आहेत मायग्रेन,क्लस्टर डोकेदुखी,सायनस डोकेदुखी,हार्मोनल डोकेदुखी.

अर्धे डोके कशामुळे दुखते?

अर्धे डोके दुखणे म्हणजे याला प्रकाराला मायग्रेन डोकेदुखी चा प्रकार समजावा. या मध्ये देखील सामान्य डोकेदुखी प्रमाणे मेंदूला होणार रक्तपुरवठा आणि मेंदू मध्ये काही रासायनिक बदल कारणीभूत असतात.

पित्त व डोकेदुखी वर घरगुती उपाय काय आहेत.

यासाठी पित्तावर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला घरगुती उपचार इथे वाचायला मिळेल आणि डोकेदुखी साठी आपण यावर ब्लॉग बनवला आहे. कृपया तिथे याबद्दल माहिती घ्या.

माझी डोकेदुखी गंभीर आहे हे मला कसे कळेल ?

जर तुमची डोकेदुखी अचानक चालू झाली असेल,वाढत चालली असेल,डोक्याला दुखापत झाल्यानंतर चालू झाली,डोकेदुखीबरोबर इतर मानसिक स्वरूपाचे लक्षण दिसत असेल आणि एकंदर त्या डोकेदुखी मुळे तुमचे दैनंदिन रूटीन बिघडत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

3 thoughts on “डोकेदुखीवर घरगुती उपाय – १० मिनिटांत मिळेल आराम”

Leave a Comment